महाराष्ट्रात १५ ऑगस्टपासून काय सुरु, काय बंद ?
मुंबई-राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागली आहे. त्यामुळे राज्यसरकारने कोरोनाच्या निर्बंधात शिथिलता आणली आहे. १५ ऑगस्ट पासून मुंबई लोकल मध्ये प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरीकांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्याच बरोबर आता १५ ऑगस्ट पासून राज्यातील हॉटेल ,रेस्टॉरंट आणि मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.या बाबत अधिकृत आदेश रात्री उशिरापर्यंत जारी होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यातील हॉटेल दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र ही वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच सरकारने हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच मॉल पण १० वाजे पर्यंत सुरु राहणार असून ज्यांचे दोन डोस झाले असतील त्यांनाच मॉल मध्ये प्रवेश मिळणार आहे. मात्र मंदिरे ,प्रार्थनास्थळे, जलतरण तलाव व चित्रपटगृहे, नाट्यगृहे अद्याप बंद आहेत.
महाराष्ट्रात १५ ऑगस्टपासून काय सुरु, काय बंद ?
* लसीचे दोन डोस घेतलेल्याना लोकल ट्रेन मध्ये परवानगी
* हॉटेल्स, रेस्टॉरंट, जिम, मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार
* खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाहसोहळ्यांसाठी १०० जणांना परवानगी
*सभागृहातील विवाह सोहळ्यांसाठी १०० जणांना परवानगी
* सदर आस्थापना ५० टक्के क्षमतेनं सुरु राहणार
* खासगी कार्यालयांमध्ये शिफ्ट ड्युटीमध्ये काम करत कार्यालयं २४ तास सुरु ठेवता येतील
* नाट्यगृह, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळं बंद
* इनडोअर गेम्ससाठी लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मान्यता
* हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आलेल्यांना वेटींग कालावधीत मास्क घालणं बंधनकारक, तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणं आवश्यक.