नाशिक,२७ नोव्हेंबर २०२२ – शरीर आहे तो पर्यंत भजन होईल. विना अन्न मनुष्य जगू शकत नाही. सत्संग, भजनाविना जीवन अपूर्ण आहे. सर्वांचेच मन भजनात लागत नाही. भजन अमृत असून, सकाळ, संध्याकाळी हे अमृत प्राशन करण्याची गरज असल्याचे विचार पूज्य भाईश्री रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केले.
वै. परमपूज्य योगिराम तुकाराम बाबांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी नाशिकच्या पंचवटीतील तपोवनात सुरू असलेल्या राम कथेत रविवारी दुसऱ्या दिवशी भाईश्री बोलत होते. ते म्हणाले की, भूक लागली तर आनंदाने जेवण करतात. परंतु भूक नसेल तर दोष काढतात. भोजनानंतर मन संतुष्ट होते, तृप्तीचा ढेकर येते. भोजनाने तृष्टी, पृष्टी, श्रुधा , निवृत्ती येते. सांसारिक विषयाची निवृत्ती देखील अध्यत्म वाढल्यास येते. भगवान् गोस्वामी यांनी रामायणाची रचना केली. कल युगात महर्षी वाल्मीक तुलसीदास बनले होते. विषय एकच ती रामकथा. परंतु दोन भाषा वेगळ्या आहेत. वाल्मीक ऋषींनी संस्कृतमध्ये रामायण लिहिले. तर गोस्वामी तुलसीदास महराजी सध्या बोली भाषेत रामायण लिहिले. वाल्मिकी यांनी रामायणात आदर्श जिवनाचा परिपाठ देण्याचा उद्देश होता.
राम चरित मानस प्रत्येकाने ध्यानाने पठण करण्याची आवश्यकता असून यात कर्म, ज्ञान, भक्ती, शरणागती याचे चिंतन आहे. त्यात श्रीराम कोण आहे ? असा प्रश्न येतो. त्यांचे उत्तर रामायणात येते. सत्संगाने श्रद्धा वाढते , मग रती (प्रेम) वाढेलआणि नंतर भक्ती येते. नंतर वैराग्य येईल अर्थात विषयभोग संपेल. मन भटकायचे बंद होईल. परमात्मा हा श्रध्येचा विषय आहे. भाईश्री यांनी विविध दाखले देत रामायणातील अनेक प्रसंग विशद केले.
आरती साहित्यिक लेखक कवी नरेश महाजन, डॉ. शंकर बोर्हाड़े, रविंद्र मालुंज़क़र, जयश्री वाघ, विवेक उगलमुगले, प्रशांत केंदळे, राजेंद्र उगले, , किरण चव्हाण, सुभाष सबनीस आदीच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी महंत उमेश महाराज माधवदास महाराज राठी, जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवासाठी शाकाहारच
शाकाहार चांगला आहे. परंतु मांसाहार वाईट आहे असेही नाही. शाकाहार उचित असून, मानवासाठी शाकाहारच आहे. मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितात.शाकाहारी होटाणे पाणी पितात. बुद्धिमान व्यक्तीने स्वतःलाच विचारावे आपण जिभेनी की होटाने पाणी पितो. शरीर अनेक रोग होण्याची शक्यता आहे. अंत्य विधि नंतर स्नान केले जाते. धर्म निती नियम तोडले जातात. मांसाहार धर्माच्या विरोधात आहे. मांसाहारी मनुष्य वाईट आहे हे मानने चुकीचे आहे.