कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक : वेटलिफ्टिंगमधील तिसरं पदक

0

नवी दिल्ली – कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे.कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील  जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू  हीने  भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये भारतीय वेटलिफ्टर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत.आजच्या दिवसात भारताने मिळवलेलं हे तिसरं पदक आहे.आधी महाराष्ट्राचा संकेत सरगर त्यानंतर गुरुराज पुजारी  यांनी अनुक्रमे रौप्य आणि मग कांस्य पदक मिळवलं.

मीराबाईने ४९ किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. एकूण २०१ किलोग्राम वजन उचलत मीराबाईनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.यावेळी मीराबाईने क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये ८८ किलोग्राम वजन उचलत मीराबाईने आपली आघाडी कायम ठेवली. त्यामुळे त्याने एकूण २०१ किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा रेकॉर्ड करत मीराबाईने गोल्ड जिंकवून दिलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या मीराबाईकडून कॉमनवेल्थ मध्ये सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती, जी तिने पूर्ण करत भारतासह स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

वेटलिफ्टिंगमधील तिसरं पदक
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने आज दिवसभरात तीन पदकं मिळवली आहे. सर्वात आधी ५५ किलो वजनी गटात एकूण २४८ किलोग्राम वजन उचलत सांगलीच्या संकेत सरगर याने रौप्य पदक मिळवलं. त्यानंतर आता ६१ किलो वजनी गटात एकूण २६९ किलोग्राम वजन उचलत गुरुराजा पुजारी याने कांस्य पदक मिळवलं आहे. त्यामुळे स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदक मिळवली आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.