मुंबई : आयसीसीने २०२१ टी-20 विश्वचषकाच्या शेड्यूलची घोषणा केली आहे.या वर्षी स्पर्धेचे आयोजन ओमान आणि यूरोपमध्ये करण्यात आलं आहे.क्रिकेट प्रेमींना आवडणारी ही स्पर्धा या वर्षी भारतात होणार होती परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. १७ ऑक्टोबर ला सुरु होणाऱ्या या स्पर्धेची फायनल १४ नोव्हेंबरला होणार आहे.या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान बरोबर होणार असून २४ ऑक्टोबरला तो दुबईमध्ये रंगणार आहे.२०१६ नंतरचा हा पहिला टी-२० वर्ल्डकप असेल.
भारत-पाकिस्तानमध्ये अनेक कारणामुळे अनेक दिवसापासून सामने खेळवले गेले नाही आहेत. पण आता १७ ऑक्टोबर पासून टी -20 वर्ल्डकपमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याकडे भारत-पाकिस्तानमधील चाहत्यांसह संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा एका वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने असणार आहेत.
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे गट आधीच जाहीर झाले आहेत. पहिल्या फेरीत ८ संघ सुपर १२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील फक्त अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील.ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणार्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील. २०१६ नंतरचा हा पहिला टी-२० वर्ल्डकप असेल.