भारतातील दिग्गज उद्योगपती,शेअर बाजाराचा ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचं निधन

0

मुंबई – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार  भारतातील दिग्गज उद्योगपती आणि शेअर बाजाराचा ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालंय. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.मधुमेह आणि किडनीच्या आजाराने त्रस्त होते.आज सकाळी (रविवारी १४ ऑगस्ट) सकाळी ६.४० च्या सुमारास त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं,परंतु, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्युनंतर संपूर्ण देशभरात शोककळा परसली आहे.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह  यांच्यासह अनेक दिग्गाजांनी राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली वाहली आहे.

राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.  राकेश झुनझुनवाला यांनी सुरुवातीला १०० डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यावेळी सेन्सेक्स निर्देशांक १५० अंकांवर होता, जो आता ६० हजारांवर पोहचलाय. त्यांना भारतीय शेअर बाजाराचे वॉरन बफेट असंही संबोधलं जात असे.

राकेश झुनझुनवाला यांनी अकासा एअरलाइन्स सुरू केली. त्यांचं बॉलिवूडशीही त्यांचे जवळचं नातं होतं. अकासा एअरलाइन्सची सर्वात मोठी भागीदारी त्यांची पत्नी रेखा आणि झुनझुनवाला यांच्याकडे होती. रिपोर्ट्सनुसार, दोघांची अकासा एअरलाइन्समध्ये ४५.९७ टक्के भागीदारी होती. ५ जुलै १९६० रोजी राजस्थानी कुटुंबात जन्मलेल्या राकेश झुनझुनवाला आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईत राहत होते.

राकेश झुनझुनवाला हे निर्माते देखील होते. व्यवसायासोबतच चित्रपटसृष्टीचीही त्यांना विशेष ओढ होती, असं म्हटलं जातं. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली. ज्यामध्ये इंग्लिश विंग्लिश, शमिताभ, की अँड का यांचा समावेश आहे. १९९९ मध्ये त्यांनी हंगामा डिजिटल मीडिया ही ऑनलाइन प्रमोशन एजन्सी म्हणून सुरू केली, त्यानंतर ते अध्यक्ष झाले. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी त्याचं नाव बदलून हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड केलं. २०२१ मध्ये हंगामा म्युझिक आणि हंगामा प्ले देखील OTT प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!