ओझर विमानतळावरून आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होणार खा.गोडसे यांची माहिती

0

नाशिक– ओझर विमानतळावरून देशभरातील सहा प्रमुख शहरांसाठी विमानांची उड्डाणे सुरु आहेत. ओझर विमानतळावरून देशातच नव्हे तर परदेशातही जाण्यासाठी विमानसेवा असावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या सुरु असलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई सेवेसाठी उभारण्यात आलेल्या सोयी – सुविधांची खासदार गोडसे यांनी पाहणी केली.खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दोन कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा एचएएल प्रशासनाकडून उभारण्यात आल्या असून आता इमीग्रेशनची परवानगी मिळताच लवकरच ओझर विमानतळावरून विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिले आहे.

international flights will now start from Ozar Airport

देश विदेशात जाण्यासाठी ओझर येथून विमानसेवा असावी यासाठी खा गोडसे गेल्या काही वर्षापासून प्रयत्नशील होते.खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने उड़ाण योजनेअंतर्गत नाशिक येथून देशभरातील प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू केलेली आहे . यामध्ये अहमदाबाद , दिल्ली, सुरत, पुणे आणि बेळगाव या शहरांचा समावेश आहे. वरील हवाईमार्गावरील विमान सेवेला नासिक कराकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने सदर मार्गावरील हवाईसेवा नियमितपणे सुरू आहे.

देशांतर्गत हवाई सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून ओझर येथून आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरु व्हावी यासाठी गेल्या काही वर्षापासून खा गोडसे यांनी प्रयत्न सुरू केले होते.हवाईसेवेच्या प्रस्तावाला दोन वर्षांपूर्वी केंद्राने हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर विमानतळावर पायाभूत सुविधा उभारण्यासाठीच्या कामासाठी निधीचा प्रश्न निर्माण झाला होता. खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एचएएल प्रशासनाने दोन कोटींचा निधी खर्च करून आज मितीस या विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती पूर्ण केली आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या विभागांच्या सर्व परवानग्याही मिळाल्या आहेत.पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या असून विविध विभागांच्या परवानगीही प्राप्त झाल्याने आता ओझर विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर  खा.गोडसे यांनी येथील ओझर विमानतळावर जात आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी उभारण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांची पाहणी केली.

यावेळी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एचएएल प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या इमीग्रेशन चेक पाईंट, कस्टम,प्रस्थान सुविधा आणि स्वतंत्र आगमन आदी सोयी सुविधा पाहून खा.गोडसे यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे यापुढे उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, यात्रेकरू आणि व्यवसायिकांना परदेशात जाण्यासाठी मुंबई विमानतळावर जाण्याची गरज नसून जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रातील शेतक – यांनाही आपला शेतीमाल विक्रीसाठी सहज परदेशात पाठविणे शक्य होणार असल्याचे खा . गोडसे यांनी स्पष्ट केले आहे. विमानांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ओझर विमानतळ सज्ज झाले असून इमीग्रेशनची परवानगी मिळताच आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाण सुरु होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.