युद्ध पेटले:इस्रायलचा मशहद विमानतळावर हवाई हल्ला
इंधन भरणाऱ्या विमानाला लक्ष्य,इराणचे जबरदस्त प्रत्युत्तर
📍 तेहरान/जेरुसलेम | दि. १६ जून २०२५-Israel Iran airstrikes इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता थरारक टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या ३ दिवसांत दोन्ही देशांत जबरदस्त हवाई हल्ल्यांची मालिका सुरु असून, इस्रायलने पूर्व इराणमधील मशहद विमानतळावर हवाई हल्ला करत इंधन भरणाऱ्या विमानाला लक्ष्य केल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे.
🚀 ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत सर्वात लांब पल्ल्याचा हल्ला(Israel Iran airstrikes)
इस्रायलच्या “ऑपरेशन रायझिंग लायन” अंतर्गत हा आजवरचा सर्वात लांब पल्ल्याचा हल्ला मानला जात आहे. इस्रायलने नतांझ येथील अणुऊर्जा केंद्र, लष्करी तळ आणि इंधन साठ्यांवर एकाचवेळी हल्ले केले.
Israel now hits Mashhad International Airport, #Iran #IranUnderAttack #IranIsrael #IRGCterrorists pic.twitter.com/NbanvfMBfq
— ᴅᴇʙᴀᴊɪᴛ ꜱᴀʀᴋᴀʀ🇮🇳 (@debajits3110) June 15, 2025
⚔️ वरिष्ठ इराणी अधिकारी ठार
या हल्ल्यांमध्ये इराणचे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे कमांडर-इन-चीफ होसैन सलामी, तसेच सशस्त्र दलांचे प्रमुख मोहम्मद बाघेरी आणि अनेक वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ ठार झाल्याचे इराणी प्रसारमाध्यमांनी जाहीर केले आहे.
मृत्यू: ७८ हून अधिक
जखमी: ३२० पेक्षा जास्त
🔥 इराणचे तुफानी प्रत्युत्तर
इस्रायलच्या या हल्ल्यांनंतर, इराणने शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे इस्रायलवर सुमारे १०० ड्रोन आणि शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. तेल अवीव, हाइफा, जेरुसलेमसह अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले.
🛡️ नेतन्याहूंची इशारा
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर इराणने नागरिकांना लक्ष्य करणे सुरू ठेवले, तर तेहरान जळून खाक होईल.” त्यांनी इराणी जनतेला उठाव करायला सांगितले.
🧭 इराणचा अमेरिकेला इशारा
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी अमेरिकेला स्पष्ट सांगितले की, इजरायली हल्ले सुरू राहिल्यास ते आण्विक चर्चेत सहभागी होणार नाहीत. तसेच, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने हस्तक्षेप केल्यास त्यांचे सैनिकी ठिकाणे लक्ष्य केली जातील, असा इशारा दिला आहे.
⚓ अडानी समूहाच्या हाइफा बंदरावर कोणताही परिणाम नाही
ईरानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये अडानी समूहाच्या हाइफा बंदराला कोणतीही हानी पोहोचली नसल्याचे पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. रासायनिक टर्मिनल आणि तेल रिफायनरीजवळ क्षेपणास्त्रे पडली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही, आणि बंदरावर माल वाहतूक सुरळीत सुरू आहे.
[…] […]