Jammu-Kashmir:पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला २७ जणांचा मृत्यू !

हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू

0

श्रीनगर,दि २२ एप्रिल २०२५ –  जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात हल्ल्यात १२ जण जखमी झाले असून एकूण २७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक  माहिती समोर येत आहे.पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हा हल्ला झाला आहे.अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले केले आहेत. घटनास्थळी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे तर हल्ला झालेले पर्यटक हे राजस्थानचे नागरिक असून यात काही स्थानिकही जखमी झाले आहेत.या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे. सुरक्षा दलाकडून शोधकार्य सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे अमरनाथ यात्रेला काही दिवसात सुरूवात होत असतानाच हा हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

या भ्याड ह]ल्या नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे अमित शाहांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केल करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.दहशतवादी हे पोलिस युनिफॉर्ममध्ये आले आणि त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यामागे टीआरएफ दहशवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सीआरपीएफची क्विक रिअॅक्शन टीम घटनास्थळावर तैनात करण्यात आली आहे.

भेळ खात असताना दहशतवाद्यांनी पतीला गोळी घातली
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका महिलेच्या पतीला गोळी घालण्यात आली. हल्ल्यानंतरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यामध्ये पर्यटक आणि स्थानिक पळापळ करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्या पतीला गोळी घातल्याचं सांगत आहे. दहशतवाद्याने गोळी घालण्याआधी मुस्लिम आहात का? असं विचारलं होतं. महिने सांगितलं की, मी पतीसह भेळ खात होते, त्याचवेळी एक दहशतवादी आला. त्याने विचारलं मुस्लिम आहेस का? आणि नंतर पतीला गोळी घातली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!