Jammu Kashmir Pahalgam Terror Attack :हल्लेखोरांचे फोटो व्हायरल
सैन्याला सतर्क राहण्याच्या सूचना :हल्लेखोरांना सोडणार नाही ; पंतप्रधान नरेंद्र मोदी
श्रीनगर,दि २३ एप्रिल २०२५ – जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.फोटोत दहशतवादी एके-47 हातात घेऊन असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी दुपारी २:३० च्या सुमारास ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात २७ जणांना आपला जीव गमवावा लागला.
पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने जम्मू आणि कश्मीरमधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दल आता हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी या घटेनेचे वर्णन केले आहे. ‘गोळीबार होताच पर्यटक गवताळ प्रदेशात आश्रय घेण्यासाठी पळून जात होते. मात्र हा भाग मोकळा असल्याने लपण्यासाठी जागा नव्हती’, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
घटनास्थळावरील दृश्यांमध्ये मृतदेह कुरणावर पडलेले दिसत होते तर स्थानिक लोक मदतीसाठी धावत गेले तेव्हा महिला आक्रोश करताना दिसत होत्या. हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियात होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा दौरा अर्धवट सोडून आज बुधवारी सकाळी दिल्लीला परतले. हल्ल्याचा निषेध करताना पंतप्रधानांनी हल्लेखोरांना सोडले जाणार नाही असे आश्वासन देशवासीयांना दिले आहे. हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली आहे आणि ते तातडीने सुरक्षा आढावा घेण्यासाठी पहलगामला पोहोचले आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाला परत आले आणि परत आले पहलगम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीसौदी अरेबिया दौर्यावरून भारतात परतले आहेत. पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी नवी दिल्लीला पोहोचले आणि नवी दिल्लीला पोहोचताच विमानतळावर उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील उपस्थित होते आणि पंतप्रधान मोदी यांनी बैठकीतील परिस्थितीबद्दल विचारपूस केली.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्याचा आपला कानपुर दौरा रद्द केला आहे.