नाशिक लोकसभा मतदार संघात जितेंद्र भावे फॅक्टर वाढतोय …!

0

नाशिक,दि, १४ मे २०२४ – नाशिक लोकसभा  मतदार संघाचे मतदान येत्या २० मे रोजी होणार आहे.अनेक घडामोडी घडता आहेत अगदी पंतप्रधानांपासून ते महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या सभा नाशिकला होत असल्यातरी सुध्न्य मतदार आरोप प्रत्यारोपाने त्रस्त झाला असल्याचे एका सर्व्हेतून कळते आहे..मतदान करतांना “Nota’ पर्याय जरी असले तरी आता सर्वसामान्यांसाठी  निर्भय महाराष्ट्र पार्टी कडून लढणारे उमेदवार जितेंद्र भावे हा फॅक्टर नाशिक लोकसभा मतदार संघात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे एका सर्व्हेत कळते आहे.

पेपर विक्रेता म्हणून सुरुवात केलेल्या जितेंद्र भावे यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र न बघता पिडीत जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. मग तो कोव्हीडचा काळ असो वा रिक्षा चालकांसह ,बँकांकडून कर्ज घेणाऱ्याच्या प्रश्न असो वा शैक्षणिक प्रश्न असो सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या जितेंद्र भावे हा सर्यावसामन्य माणसाचा जिव्हाळ्याचा माणूस बनला आहे. त्यामुळे  जितेंद्र  भावे मुळे राजकीय समीकरण बदलतील असा सूर सर्वसामान्य जनतेत दिसून यायला लागला आहे.

आपले प्रत्येक आंदोलने फेसबुक च्या माध्यमातून लाईव्ह करून भावे सर्वसामान्य जनत्तेचेच नव्हे तर विचारवंतांच्या हि मनात घर करून बसले आहेत. सर्वसामान्यांचा आवाज प्रशासनाच्या योग्य व्क्तीकडे पोहचवयाचे काम आज पर्यंत भावे यांनी केले आणि त्याचा रिझल्ट तातडीने मिळाला असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. राजकीय संघर्षाने त्रस्त झालेली नाशिककर जनता आता जितेंद्र भावे यांचा निश्चित विचार करतील का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.