नांदेड :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर विजयी झाले.जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला आहे. पोटनिवडणुकीची मतमोजणी आज शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या ३० फेऱ्यानंतर निवडणूकीचा अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केला.
उमेदवारनिहाय मतमोजणीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे
जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस १ लाख ८ हजार ८४०), सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी ६६ हजार ९०७) , उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी ११ हजार ३४८), विवेक पुंडलिकराव केरुरकर (जनता दल (सेक्युलर) ४६७), प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी १५५), डी. डी. वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) २१५), अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष १४३), गजभारे साहेबराव भीवा (अपक्ष १८३), भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष २७४), मारोती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष २४३), श्रीमती विमल बाबूराव वाघमारे (अपक्ष ४९६), कॉ. प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष ४८६), नोटा (वरीलपैकी कोणीही नाही) (१ हजार १०३) , रद्द झालेले मतदान ३० आहे, असे एकुण १ लाख ९० हजार ८९० एवढे मतदान झाले आहे. या देगलूर पोटनिवडणूकीसाठी एकुण १५० अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले होते.