अद्यावत ज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड घालून पत्रकारिता करावी – मिलिंद सजगुरे

0

नाशिक – वाढत्या स्पर्धेच्या युगात पत्रकारांनी ज्ञान व तंत्रज्ञान याची योग्य ती सांगड घालून पत्रकारिता विकसित करावी त्याचप्रमाणे सर्वच क्षेत्रातील अद्यावत माहिती मिळवण्यासाठी सदैव तत्पर असावे असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक मिलिंद सजगुरे यांनी केले, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि. संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे भद्रकाली पोलीस स्टेशन शेजारील मौला बाबा ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित पत्रकार कार्यशाळेत श्री सजगुरे मार्गदर्शन करीत होते.

आताच्या स्पर्धेच्या पत्रकारितेत पत्रकार व कॅमेरामन अशा दोन्ही भूमिका अद्यावतपणे पार पाडण्यासाठी पत्रकारांनी सज्ज असावे. आजच्या पत्रकारितेतील स्पर्धा या विषयावर आयोजित कार्यशाळेत मिलिंद सजगुरे यांनी पत्रकारितेतील स्पर्धांविषयी विविध उदाहरणे देत उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेशपंत ठोंबरे उपाध्यक्ष लियकत पठाण, उपाध्यक्ष पंकज पाटील, संघटक करण बावरी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय व सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेशपंत ठोंबरे यांनी पत्रकारांसाठी विविध विषयावरील कार्यशाळा नियमितपणे आयोजित करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी वकार खान, सुनिता पाटील, करण सिंग बावरी, लियाकत पठाण, तौसिफ शेख , नंदकिशोर गांगुर्डे यांचे सह दहा पत्रकारांना बेस्ट न्यूज ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेत उपस्थित सर्व पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी दिनेश पगारे, वसीम शेख, अब्दुल कादिर, तुकाराम कातकडे आदींसह सदस्य प्रयत्नशील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण सिंग बावरी यांनी केले आभार लियाकत पठाण यांनी मानले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!