‘कांतारा: चैप्टर 1’ चे दमदार पोस्टर ऋषभ शेट्टीच्या वाढदिवशी प्रदर्शित
चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ ला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित !
मुंबई, दि. ७ जुलै २०२५ – Kantara Chapter 1 poster कांतारा या चित्रपटाने भारतीय सिनेमासृष्टीला एक वेगळी दिशा दिली होती. लोककथांचे प्रभावी चित्रण, जबरदस्त अभिनय आणि दमदार पटकथेमुळे हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात मोठा ‘हिट’ ठरला होता. KGF आणि सालार यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या निर्मितीमागील होम्बले फिल्म्स यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती.
आता याच यशस्वी चित्रपटाचा प्रीक्वल – कांतारा: चैप्टर 1 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऋषभ शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा एक नवीन आणि भव्य पोस्टर आज जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पोस्टरसह मेकर्सनी चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणाही केली आहे.
कांतारा: चैप्टर 1 ही कथा त्या काळाची आहे जिथून ही परंपरा आणि दंतकथा सुरू झाली होती. हा चित्रपट ‘दहाड होण्याआधीची सुरुवात’ दाखवणार आहे. ऋषभ शेट्टीच्या अद्वितीय आणि शक्तिशाली लूकमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
शूटिंगचा भव्य स्केल:(Kantara Chapter 1 poster)
या चित्रपटात एक भव्य युद्ध दृश्य तयार करण्यात आले आहे ज्यासाठी देश-विदेशातील तज्ज्ञांच्या मदतीने ५०० हून अधिक प्रशिक्षित लढवय्ये आणि ३००० लोकांचा सहभाग घेतला गेला आहे. हे दृश्य सुमारे २५ एकरांवर पसरलेल्या गावात तब्बल ४५ ते ५० दिवसांपर्यंत चित्रीत करण्यात आले आहे. हे दृश्य भारतीय सिनेमातील एक ऐतिहासिक दृश्य ठरण्याची शक्यता आहे.
होम्बले फिल्म्सचा सिनेमा विश्वावर ठसा:
‘कांतारा: चैप्टर 1’ शिवाय होम्बले फिल्म्सच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये ‘सालार: पार्ट 2 – शौर्यंग पर्वम’ आणि अन्य मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आगामी काळात वेगळ्या cinematic अनुभवाची हमी मिळणार आहे.