देश व शाळेचा विकास हेच ध्येय समोर ठेवा:कर्नल किशोर चौधरी

0

दादासाहेब गुलाबराव बोरसे शेतकी विद्यालय कळंबू येथील इ.१० वीचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी ३० वर्षानंतर एकत्र येऊन भरविला स्नेह मेळावा.विद्यालयात शिकत असताना वर्गमित्र म्हणून असणारी आपुलकीला उजाळा मिळावा म्हणून व्हॉट्सॲप च्या माध्यमातून एकत्र आले  त्या ग्रुप ला ,”सर्कल ऑफ ट्रस्ट १९९४” असे नाव ठेवले व त्याच्या मथळ्याखाली एकत्र येऊन दैनंदिन जीवनाचे विश्व विसरून मनसोक्त गप्पागोष्टी, जुने वर्गमित्र त्यांच्या नवनव्या आठवणी त्यातून अनंत हास्य जत्रेचा आनंद व परिवारातील गमती जमती सांगून साजरा केला गेट-टु गेदर.कुकावल, कोठली व कळंबू येथील १९९४ साली इ.१० वीतील वर्गमित्र पुणे, मुंबई, सेलवास,सुरत, औरंगाबाद व नाशिक इथून येऊन छोटेखानी कार्यक्रम साजरा केला.

त्यात संस्कार घडविणारे दिवंगत शिक्षक स्व.टी .एस .तेली सर,स्व. न .मा. बोरसे सर,स्व. एम .बी .निकूंभ सर व वर्गमित्र स्व. भारती भामरे, स्व.जितेंद्र गिरासे, स्व.लखे सिंग राजपूत,स्व. ईश्वर राजपूत, स्व.काळु सूर्यवंशी व वर्ग मैत्रिणी प्रमिला सोनवणे चे पती स्व. अनंत चव्हाण, व पदमा गिरासे चे पती  स्व.श्याम सिंग गिरासे व  वैशाली उपासनी चे पती स्व. हरीश कुलकर्णी यांच्या आठवणींना उजाळा देऊन उपस्थित सर्वांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

वर्गमित्र कर्नल किशोर चौधरी आर्मी दाखल झाले व कर्नल पदावरून देशसेवेचे व्रत स्वीकारले म्हणून व वर्गमैत्रिणींनी आपला परिवार सोडून या कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून त्यांच्या शाल,(साडी), श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. प्रसंगी संगीता पाटील यांचा चिरंजीव रियांश पाटील यांनी देशभक्ती गीते गाऊन उपस्थितांमध्ये देश प्रेम जागृत केले., व सर्वांनी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

Keep the development of the country and the school in front of the goal: Colonel Kishore Chaudhary

सत्कारार्थी कर्नल किशोर चौधरी पुणे , मुकेश पवार जनरल मॅनेजर टोरंट पॉवर  सेलवास व अमृत बोरसे आपल्या भाषणात म्हणाले, आपण तीस वर्षात एकत्र आलो, एकमेकांचे सुखदुःख समजून घेतले. यापुढे सुद्धा आपण एकमेकांच्या संपर्कात रहा. इतरांसाठी मदतीचा हात पुढे ठेवा. देश व शाळेच्या विकासाचे ध्येय समोर ठेवा असा संदेश कर्नल यांनी दिला.कार्यक्रम उत्तम रित्या होण्यासाठी अनेक लोकांनी परिश्रम सोबत आर्थिक  नियोजन उत्तमच केले त्या महान हस्तीचे विशेष आभार  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील तर आभार अमृत बोरसे यांनी मानले. कैलास बेलदार, पंकज बोरसे,विनोद बोरसे, अविनाश बोरसे, प्रमिला सोनवणे,मनोज सोनवणे,  यांनी गेट-टु गेदर यशस्वी होण्यास परिश्रम घेतले.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.