Kurla Bus Accident:भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसली भीषण अपघातात ३५ जण जखमी :४ जणांचा मृत्यू 

0

मुंबई.दि ९ डिसेंबर २०२४ – कुर्लातील एलबीएस रोडवर मोठा अपघात झालाय. मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिली दिली असून या भीषण अपघातात जवळपास ३५ जण जखमी झाले असून यात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

रात्री ९:३० च्या सुमारास भरधाव बस ब्रेक फेल झाल्यामुळे मोठी गर्दी असलेल्या मार्केटमध्ये घुसली आहे. त्यानंतर बसने अनेक वाहनांना धडक दिली आहे. तर ३० लोकांना या बसने धडक दिल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत या अपघातात चार  जणांनी जीव गमावलाय. जखमींना भाभा  रुग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही लोकांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि ही बस मार्केटमध्ये घुसल्याची माहिती आहे.ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे बोलले जात आहे.

बाबा रुग्णालयातील माहितीनुसार, साधारण पंधरा गंभीर जखमींना आणण्यात आलं होतं. त्यातील काही जण मृत्यूमुखी पडले आहेत. काही रुग्णांना सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठा जमाव रस्त्यावर आला आहे. या जमावाला बाजूला करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. मात्र, जखमींमधील अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अगदी प्राथमिक माहितीनुसार, चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटलं होतं. कदाचित ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. आमदार महेश कुडाळकर याबाबत बोलताना म्हणाले, मी स्वत: घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जात आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. रुग्णांना मदत करणे महत्त्वाचं आहे. जवळपास ३० लोकांना मार लागल्याची माहिती आहे. काही लोकांचा मृत्यू झालाय. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेच्या बाबा हॉस्पिटलमध्ये सर्व जखमींना दाखल करण्यात आलंय.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.