माणसा माणसातील प्रेम दाखवणारे राहिले दूर घर माझे …
६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र
६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ९ डिसेंबर रोजी क्रांतीवीर कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, नाशिक संघाचे राहिले दूर घर माझे हे नाटक सादर झाले. समाजातून जातीयवाद, धर्म, भेदभाव नाहीसा होणे यातच समाजाचे हित आहे. राष्ट्राचे, गावाचे अथवा घराचे तुकडे, बटवारे करून सीमा रोखून माणसा माणसातील प्रेम कमी होत नाही हेच या नाटकातून स्पष्ट होते. माणुसकी, आपुलकीने वेगवेगळ्या जाती-धर्माचे माणसे गुण्यागोविंदाने एकत्र राहू शकतात. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात हे या नाटकाचे विशेष आहे. धर्म भेदाभेदीच्याही पलीकडे समाजाच्या कल्याणाची जबाबदारी नाटकातील माई पार पाडताना दिसतात. नाटकाच्या शेवटी माईंचा उत्तराधिकारी म्हणून माई घरातील मुलीला जबाबदारी देतात. नमाई त्यांचा बटवा व त्यांच्या जबाबदारी मुलीच्या खांद्यावर सोपवतात. तिला सांगतात की तुझ्याकडे येणारी कुठलेही व्यक्ती ही माणूस आहे, माणूस म्हणूनच त्यांच्याबरोबर बघत जा. कुठलाही जात, धर्म, पंथ त्यामध्ये बघू नको आणि त्याचा इलाज करत जा यातच खरे माणूस पण आहे ही शिकवण माई घरातील प्रत्येकाला देतात.
नाटकाचे लेखक शपथ खान यांचे तर दिग्दर्शन सनी धात्रक यांचे होते. प्रकाश योजना कृतार्थ कंसारा तर संगीत संयोजन ओम देशमुख यांचे होते. नेपथ्य समाधान मुर्तडक तर रंगभूषा माणिक नाना कानडे व भूषा मंजुषा ठाकरे यांची होती. रंगमंच सहाय्य स्वप्न पिंगळे व महेश बेलदार यांचे होते. नाटकामध्ये मंजुषा ठाकरे – माई, प्रशांत महाजन – कासिम, स्वप्ना प्रसाद – हमिदा, स्वानंदी पवार – तन्नो, कुणाल विधाते – जावेद, सागर घरटे – उस्ताद, इंद्रनील रवींद्र – नासिर, निखिल बागुल – अलीम, संगीता सावळे – आयशा, उज्वला पाटील – समीना, सोनिया नंदवानी – जरीना, सक्षय वाघ – रजा, कुणाल जगताप – हमीद, मनोज सोनवणे – मौलाना, रोहन पाटील – पत्रकार यांनी भूमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक – द थर्टीन्थ अमेंडमेंट
संस्था – मायको एम्प्लॉईज फोरम, नाशिक
लेखक – समीर मोने
दिग्दर्शक – सचिन रहाणे