अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तानातुन बाहेर : कबूल मधील युएस मिशन संपुष्टात

0

काबूल : अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांना संपवण्याचा निश्चय करुन गेलेल अमेरिकी सैन्य १९ वर्ष १० महिने १० दिवसांनी मायदेशी परतले आहेत. अमेरिकी सैन्य परत येताना शेवटच्या सैनिकाचा फोटो ट्विट करत अमेरिकेच्या सुरक्षा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. काबुलमध्ये युएस मिशन संपुष्टात आले आहे .तालिबानच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला.

अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने सोमवारी उड्डाण घेतल्यानंतर तालिबान दहशतवादी काबूल विमानतळावर शिरले आणि हवेत गोळीबार करून स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला. या दरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार फटाकेही उडवले. शेवटच्या उड्डाणासह, अमेरिकेची अफगाणिस्तानातील २०वर्षांची लष्करी मिशन संपुष्टात आली.

अमेरिका सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी सांगितले की, सोमवारी रात्री अमेरिकेचे शेवटच्या विमानाने काबूलमधून उड्डाण केले. ते म्हणाले, ‘आम्ही तिथून अनेक लोकांना बाहेर काढू शकलो नाही, त्याचे दु:ख नेहमीच राहील. जर आम्हाला १० दिवस मुदत मिळाली असती तर आम्ही सर्वांना अफगाणिस्तानातून बाहेर आणले असते. त्याचवेळी, विमानतळाबाहेर उपस्थित असलेल्या तालिबानला कळले की शेवटचे यूएस विमान देखील गेले आहे, ते एक क्षणही न गमावता आत शिरलेआणि हवेत गोळीबार करून स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला.दहशतवाद्यांनी जोरदार फटाकेही उडवले. शेवटच्या उड्डाणासह, अमेरिकेची अफगाणिस्तानातील २० वर्षांची लष्करी उपस्थिती संपुष्टात आली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.