पडद्यामागील कलाकारांचा सन्मान: ‘लावणी गौरव २०२५’पुरस्कार जाहीर
नाशिकच्या सुनील ढगे यांचाही होणार सन्मान
मुंबई, दि.७ जून २०२५ | प्रतिनिधी-Lavani Gaurav Puraskar 2025 लोककला व लावणी क्षेत्रात अपार मेहनत घेतलेल्या कलाकारांना लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांच्यातर्फे ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा दि. २४ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे संपन्न होणार आहे.
🏆 जीवनगौरव पुरस्कार(Lavani Gaurav Puraskar 2025)
या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना त्यांच्या शाहीरी परंपरेतील मोलाच्या योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे.
🌟 “लावणी गौरव २०२५” पुरस्कार विजेते:
प्रज्ञा कोळी – लावण्यवती
शाहीर दत्ताराम म्हात्रे
गायिका वंदना निकाळे
आनंद साटम – पुरुष लावणी कलाकार
उदय साटम – निर्माता
धीरज गोरेगावकर – वादक
सुभाष नकाशे – नृत्यदिग्दर्शक
भरत उतेकर – निवेदक
सुनील ढगे (नाशिक) – लोककलेसाठी विशेष सन्मान
सुनील देवळेकर – नेपथ्य तंत्रज्ञ
👑 “राजाराणी २०२५” पुरस्कार
कलाकार दांपत्य किरण डांगे आणि सुजाता कांबळे-डांगे यांचा “राजाराणी – २०२५” या विशेष पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
👏 विद्यार्थी कलाकारांचाही गौरव
महासंघातर्फे दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या कलाकारांच्या पाल्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
🎶 नवरंग स्पर्धा विजेत्यांचा गौरव
महासंघ आयोजित नवरात्र नवरंग स्पर्धेतील विजेत्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिले जातील.
💃 दिमाखदार सांगीतिक कार्यक्रमाची रंगत
कार्यक्रमात मुंबईतील सुप्रसिद्ध कलाकारांच्या नृत्यविष्कारासह सांगीतिक कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचे अध्यक्षा कविता घडशी यांनी सांगितले.
📸 हा कार्यक्रम म्हणजे लोककलेच्या जगताला दिला जाणारा सलामीचा सन्मान आहे – पडद्यामागील कलावंतांसाठी नवा आदर!