अमृतवक्ता स्वानंद बेदरकर यांची ‘जगतगुरू श्रीकृष्ण’ या विषयावर व्याख्याने   

0

नाशिक,१७ फेब्रुवारी २०२३ – येथील सरस्वती आणि श्रीपाद गलगले यांच्या संकल्पनेतून दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून भारतीय संस्कृतीतील अनेक व्यक्तिरेखांचे अभ्यासक, अमृतवक्ता स्वानंद बेदरकर हे ‘जगद्गुरु श्रीकृष्ण’ या विषयावर आपले विचार या व्याख्यानमालेत मांडणार आहेत. शनिवार दि. १८ आणि रविवार दि. १९ अशी दोन दिवस ही व्याख्याने होणार आहेत.

भारतीय जनमानसाला राम आणि कृष्ण या दोन व्यक्तिरेखांनी कायमच मोहिनी घातली आहे. त्यातील कृष्णाचे व्यक्तिमत्व आजवर अनेक अभ्यासकांनी अनेक पद्धतीने अभ्यासले आहे. कृष्णचरित्रातील प्रसंगांचा अन्वयार्थ जाणून घ्यावा यासाठी या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. गलगले यांनी सांगितले.

कृष्णावर आजवर अनेक साहित्यकृती देखील निर्माण झाल्या असून त्यातून कृष्णरुपाचे  ‘जगद्गुरू’ असणे या व्याख्यानातून श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. गंगापूर रोडवरील कुर्तकोटी डॉ. शंकराचार्य सभागृहात सायंकाळी सहा ते आठ या वेळात ही व्याख्याने संपन्न होतील तरी रसिकांनी व्याख्यानांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!