नाशिक शहरात बिबट्याची दहशद : द्वारका परिसरात बिबट्या जेरबंद 

दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला रेस्क्यु करण्यात वनविभागाला यश 

0

नाशिक,२३ नोव्हेंबर २०२२ – नाशिक शहरातील  द्वारका परिसरातील पखाल रोडवर आयेशा नगर भागात एका बंगल्यात शिरलेल्या बिबट्याचे रेस्क्यु करण्यात वनविभागाला यश आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री द्वारका परिसरातील आयेशानगर भागातील रहिवासी परिसरात काल रात्री १० : ३० वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन काही नागरिकांना झाल्याने खळबळ उडाली .घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले,या  भागातील रहिवासी  ऐजाज काझी यांच्या बंगल्यात बिबट्या शिरल्याचे नागरिकांना लक्षात आले. त्यांना त्वरित याबाबतची माहिती वनविभागाला कळवली. बिबट्या असल्याचे समजताच परिसरातील नागरिक भयभित झाले होते. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले,दिड तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले.

Leopard terror in Nashik city: Forest department succeeded in rescuing the leopard in Dwarka area

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने ग्रामीण भागाबरोबरच शहराच्या काही भागात धुमाकूळ सुरु आहे, त्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे, काल या भागात बिबट्या आल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती,वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे यांना रेस्क्यु ऑपरेशन करण्यात त्यांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे मुंबई नाका पोलिसांची कुमक यावेळी नागरिकांना हटविण्यासाठी बोलविण्यात आली होती.

बिबट्याला जेरबंद केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. घटनास्थळी वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपरिमंडल अधिकारी अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यु ऑपरेशन सुरु होते. सुरुवातीला बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. पहिल्या इंजेक्शनमध्ये बिबट्या काही अंशी बेशुद्ध झाला होता. अखेर दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला रेस्क्यु करण्यात आले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.