📍दिंडोरी,नाशिक,दि. १५ जून २०२५ – Leopard attack in Nashik नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव गावात आज सकाळी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात पाच ग्रामस्थ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
🐆 हल्ल्याची घटना:(Leopard attack in Nashik)
आज सकाळी सुमारे ९.३० वाजता, वामन नाना लिलके हे पांडुरंग देसले यांच्या पडित शेतात शौचविधीसाठी गेले असताना, झाडाझुडपात लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. त्यांचा आरडा-ओरडा ऐकून मदतीसाठी धावलेल्या सोमनाथ केरू लिलके, विठ्ठल केरू लिलके, लहानू कचरू लिलके आणि लहानू पांडुरंग लिलके यांनाही बिबट्याने हल्ला करून जखमी केले.
🩺 उपचार:
जखमींना प्रथम कोचरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सर्व जखमींच्या हातावर, मांडीवर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
🌲 वनविभागाचे पथक दाखल:
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनपाल अशोक काळे, तसेच वनरक्षक बागुल, गांगोडे, वनसेवक व स्थानिक पोलिस पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी भेट दिली.
🔒 पिंजरा लावण्यात आला:
बिबट्या १० ते १२ एकरांच्या पडित शेतात अजूनही लपलेला असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर तेथे पिंजरा लावण्यात आला आहे. परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
[…] घटनेत एका साडेतीन वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आईच्या […]