मुंबई – झी मराठीवर एक दशकाहून गाजलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांसह जगभरातील प्रेक्षकांचा आणि तमाम वहिनींचा अत्यंत आवडता कार्यक्रम ठरला आहे.कोरोनाच्या महामारीमुळे सर्वानाच लॉकडाऊनला सामोरे जावे लागलं या काळात आदेश भाऊजी ‘होम मिनिस्टर घरच्याघरी’ द्वारे तमाम वहिनींची ऑनलाईन भेट घेत होते. आता आता पुन्हा एकदा दार उघड वहिनी असं म्हणत वहिनींच्या घरी हा पैठणीचा खेळ रंगवण्यासाठी सज्ज असून होम मिनिस्टर चे नवीन पर्व २६ जुलै पासून सुरु होते आहे.
या नवीन पर्वात आपल्या घरातील लिटिल चॅम्प्स घरातील वहिनींना पैठणी मिळून देण्यासाठी या पर्वत महत्वाची भूमिका बजावणार आहेत.या नव्या पर्वासाठी वाहिनीसह घरातील बच्चे कंपनी माहे या नव्या पर्वाविषयी प्रचंड उत्सुक झाले आहेत.या पर्वात तुमच्या लिटिल चॅम्प सोबत सहभागी व्हा आणि पैठणीच्या या वेगळ्या खेळाचा आनंद लुटा असे आवाहन झी मराठी तर्फे करण्यात आले आहे.
या नवीन पर्वाविषयी बोलतांना आपल्या सर्वांचे आवडते आदेश भाऊजी म्हणाले कि झी मराठीवरील “एका दशकाहून जास्त होम मिनिस्टर हा कार्यक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन सन्मान करत असून त्यांच्या चेहऱ्यावर एक छान हसू उमटवत आहे. या कार्यक्रमात अनेक विविध आणि नाविन्यपूर्ण स्वरूप प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आले. आता लिटिल चॅम्प्स या नवीन पर्वात वहिनींना त्यांच्या घरातील लिटिल चॅम्प्स पैठणी जिंकण्यात मदत करतील, त्यामुळे हा बदल सर्व प्रेक्षकांना आवडेल आणि तितकाच रंजक देखील वाटेल याची मला खात्री आहे.