६३ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव: विभागीय पारितोषिक वितरण सोहळा ५ मे रोजी नाशिकमध्ये

0

मुंबई,१ मे २०२५- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे (Maharashtra Cultural Department)आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा व २१ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील विजेत्यांचा विभागीय पारितोषिक वितरण सोहळा (Divisional Prize Distribution Ceremony )सोमवार,५ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता नाशिक येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार आहे.या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात प्राथमिक फेरीत उत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकार,तंत्रज्ञ व नाट्य संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. नाट्य क्षेत्रातील नवोदित प्रतिभांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो.

या कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड.आशिष शेलार व मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई(Maharashtra Cultural Department)यांच्या वतीने हा कार्यक्रम साकारला जात आहे.

सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी सर्व नाट्यरसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!