राज्य गुंडांच्या तावडीत:गृहमंत्री अदृश्य :संजय राऊतांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या ! खासदार संजय राऊत यांची मागणी
मुंबई,दि,८ फेब्रुवारी २०२४ – ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची आज मुंबईमधील दहिसरमध्ये गोळ्या घालून हत्या झाल्या नंतर अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे.आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर केलेला पोलिस ठाण्यातील गोळीबार हा ताजा असतानाच आजच्या प्रकाराने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरून गेला आहे. खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर यांनी ट्विट करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर केलेला पोलिस ठाण्यातील गोळीबार हा ताजा असतानाच आता मुंबई पुन्हा एकदा गोळीबाराने हादरून गेली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची आज मुंबईमधील दहिसरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर महाराष्ट्र अवघा पुन्हा एकदा बंदुकीच्या गोळीने हादरून गेला आहे. विशेष म्हणजे अभिषेक घोसाळकर यांची हत्या अत्यंत थंड रक्ताने करण्यात आल्याचे घटनाक्रमावरून स्पष्ट झालं आहे.
गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील वाढलेल्या गुंडगिरीवरून कडाडून हल्लाबोल सुरुच ठेवलेल्या खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर यांनी ट्विट करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राऊत यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात.पक्षात प्रवेश देतात.गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय. आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत !फडणवीस राजीनामा द्या !अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे.
मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात.पक्षात प्रवेश देतात.गृहमंत्री अदृश्य झाले आहेत..राज्य गुंडांच्या तावडीत आहे.म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत.
अभिषेक… pic.twitter.com/Q4LSeXzO2F— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2024