Maharashtra SSC 10th Result:उद्या दि १३ मे रोजी लागणार दहावीचा निकाल

सर्व विद्यार्थाना या संकेतस्थळांवर बघता येणार निकाल 

0

पुणे, दि. १२ मे २०२५ – Maharashtra SSC 10th Result  अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार दिनांक १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल..

यासंदर्भात बोर्डाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या स्वाक्षरीने अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून पुढील दोन आठवड्यामध्ये निकाल जाहीर होणार असं सांगितलं जात होतं. मात्र त्यापूर्वीच आज विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का देताना १३ मे २०२५ रोजी निकाल जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

कुठे पाहाल SSC निकाल 2025 (Maharashtra SSC 10th Result )
विद्यार्थी खालील संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतात:

निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमधून मूळ गुणपत्रिका वितरित केली जाणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन – पालक व विद्यार्थ्यांसाठी दिलासा
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू होते. यावर्षी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण मंडळाने अकरावीच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन स्वरूप दिले आहे. यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक बोर्डाने याआधीच प्रसिद्ध केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!