के .के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् महाविद्यालयाचा निकाल जाहीर

0

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक येथील  के .के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् महाविद्यालयाचा बी.पी.ए .पदवीचा निकाल जाहीर झाला असून पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयातील १९ विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रातील पदवी संपादन केली आहे .

K.K. Wagh College of Performing Arts Results announced

सादरीकरणाच्या कलेचे हे महाविद्यालय २०१२ मध्ये सुरु झाले पुणे विद्यापीठातील हे पहिले महाविद्यालय आहे .आजपर्यंत १०० विद्यार्थ्यांनी  पदवी मिळविली असून अनेक विद्यार्थी  गायन , वादन , नृत्य , नाट्य , दूरदर्शन मालिका या क्षेत्रांत  कलाकार म्हणून नावारूपाला आलेले आहेत . यावर्षी आकाश एस ( संगीत ) , रोहित श्रीवंत ( तबला ) पूजा कुलकर्णी (कथक नृत्य ) लतिका लोहगावकर ( नाट्य ) या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रथम येऊन  विशेष प्राविण्य  मिळविले आहे . विद्यार्थ्यांना प्राचार्य  मकरंद हिंगणे , प्रा.  नितीन पवार ,प्रा.  सुजीत काळे ,डॉ  सुमुखी अथणी , प्रा. शिल्पा देशमुख ,प्रा. विनोद राठोड , प्रा.आकाश काळे यांचे मार्गदर्शन लाभले .

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब वाघ , विश्वस्त श्री .समीर वाघ ,सचिव प्रा. के. एस . बंदी , समन्वयक डॉ .वि . मा  सेवलीकर यांनी अभिनंदन केले आहे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.