कौटुंबिक नात्याचे यथार्थ दर्शन घडविणारे “स्मरणार्थ” एका वृद्धाची शोकांतिका

६२ वी मराठी राज्य नाट्य स्पर्धा ,नाशिक -प्रवीण यशवंत.

0

स्मरणार्थ हे नाटक वृद्धाश्रम यावर –  वृद्धाश्रम ही आपली संस्कृती आहे का ? परदेशात आई वडिलांची हेळसांड होऊ लागली आणी वृद्धाश्रमाची सुरुवात झाली ती लोकप्रिय झाली,जगभर पोहचली आता आपल्याकडे तीच अवस्था. आपल्याकडे ही वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे वृद्धाश्रम एक उत्तम व्यवसाय म्हणून जागोजागी आपण बोर्ड,जाहिराती बघतो उत्तमोत्तम सेवा पुरवल्या जातील वगैरे… वृद्धांच्या समस्यांचे स्वरूप  बदलतय ? विभक्त कुटुंब पद्धती? छोटे कुटुंबं ही समस्या याच मूळ?

नाटक वृद्धाश्रमावर बोलत आणि  एका छोट्या कुटुंबातील नवरा,बायको,त्याची छोटी मुलगी आजोबा यांच्या भावभावना,नात,आणी आजोबांचा मुलगा आणी सुन ते नवरा,बायको दोघेही नौकरी करणारे त्यांच्या लहान मुलीला कमी वेळ देणारे त्यातून त्या लहान मुलीचे होणारे मानसिक खच्चीकरण ती व्यक्त कशी होणार तीची समज केवढी,त्यात नवरा बायकोच्या नात्यातील ताण त्या दोघाचा आणी मुलीच्या नात्यात निर्माण झालेला ताण आणी घरात जेष्टांची वाटणारी गरज, जर घरात लहान मूल असल तर ती प्रखरतेने जाणवते नाटक बघताना, ही नाटकातून येणारी भावना फार सहज  पोहोचली प्रेक्षकांपर्यंत ह्यात कलाकार आणी दिग्दर्शक यांचा महत्वाचा वाटा आहे.

आण्णा या पात्राचा सुरेश गायधानी यांनी सुंदर रोल केलाय  कुटूंबा विषयी त्यांच प्रेम जिव्हाळा असलेली ओढ हे त्यांची बॉडी लेग्वेज आणि अभिनयातून उत्तम साकारलंय आणी ती दृश्य भावताही नातीचा अभ्यास घेणं,ते तिला आणी तिच्या साठी आजोबांना गरजेचे वाटणार तिच्या कडून करून घेणं हे नात मंचावर फार सुंदर फुललं आणी भावलं.

आजोबांच्या नातीचा रोल करणारी (नुपूर )  मैत्रेय गायधनी ह्या मुलीने अप्रतिम भूमिका केलीये बाल वयात तीची होणारी घुसमट,धुसपूस,ताण प्रेक्षकांनाही जानवतो सुंदर अभिनय केलाय.वृद्धाश्रमातील प्रतिभा चा रोल आदिती मोराणकर यांनी केला अगदी सहज स्टेजवरचा त्यांचा वावर प्रत्येक दृश्यात आशयाच्या दृष्टीने उत्तम परिणाम साधत होता

पीपी – शौनक गायधानी यांनी पीपीची भूमिका उत्तम होती अतिशय समजूतदार matured अशी भूमिका साकारलीये अतिशय चोख काम. भाई ची भूमिका करणारे ऋतुराज भादलीकर यांनी अतिशय सफाईदार पणे आपली भूमिका सादर केलीये.

राकेश आजोबांच्या मुलाची भूमिका केलीय आमित मुळे यांनी त्याचे नाटकातील डॉयलॉग ते फक्त बोलत होते ज्या अर्थाचे ते वाक्य होते त्या अर्थाने ते येत नव्हते तेच अभिनयाच्या बाबतीत होत.पण स्टेजवर त्यांचा आविर्भाव सुंदर होता.

राधिका ची भूमिका पूर्ती पारखं यांनी सुंदर साकारलीये त्यांची नौकरी,घर,मुलगी,नवरा यात त्यांची होणारी धावपळ,तारांबळ ही उत्तम होती

कलाकार  –स्वारंग गोरे,प्रथमेश पाडवी, शेखर शिंपी, मानसी भादलिकर,गिरीजा वर्तक,मानसी भादलिकर,स्वप्ना विंगळे,सोहम महाजन,शौनक गायधनी,सुरेश गायधनी, आदिती मोराणकर, अमित मुळे,ऋतुराज भादलीकर या सर्वांनी अतिशय चोख भूमिका सादर केल्या.

सुरेश गायधानी यांचं दिग्दर्शन अप्रतिम होते प्रत्येक सीन त्यातील दृष्य सादर होताना दिग्दर्शक दिसतो.

संगीत संयोजन मिलींद फडके आणि संगीत राजन कुलकर्णी यांनी केले प्रभावी आणि अर्थपूर्ण असे संगीत होते काही दृश्यांच्या बॅग्राउंडची वापरलेली क्लासिकल गाणी नाटकाचीच गोष्ट सांगत होती सुंदर संगीत संयोजन आणि संगीत.

नेपथ्य कुंतक गायधणी यांचं होत कामालीचा चेंज ओव्हर वृद्धाश्रम ते घर हा व्यवसाईक नाटकाचा सेट वाटावा असा.प्रकाश योजना रवी राहाणे यांची होती रंगभूषा माणिक कानडे यांची होती.

निर्मिती प्रमुख  – विजय शिंगणे
लेखक – गिरीश जुन्नरे
दिग्दर्शक सुरेश गायधनी.

प्रवीण यशवंत
मोबाईल – ७७६७८९४३५

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!