पराक्रमी योद्धा व राजकारण यावर भाष्य करणारे नाटक “त्यानं आईचं ऐकलं”

६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र

0

६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत २२ डिसेंबर रोजी अमृततुल्य जीवन बहुउद्देशीय संस्था, नाशिक संघातर्फे त्यानं आईचं ऐकलं हे नाटक सादर करण्यात आले. विल्यम शेक्सपियर यांनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी लिहिलेले हे नाटक दिलीप जगताप यांनी अनुवाद करून आताच्या काळाशी सुसंगत असे केले आहे आणि हेच या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. हे नाटक बघताना आपल्या दैनंदिन राजकारण समाजकारण याच्या आठवण करून देत राहते. यातून आपल्याला स्पष्टपणे ४०० वर्षांपूर्वी रसलेल्या नाटकातून आत्ताच्या राजनैतिक दृष्टिकोन द्रष्टेपणाने मांडलेला आहे. राजकीय सत्ता मिळवण्यासाठी लोकानूमय आवश्यक असतो. पण लोकानूमय न स्वीकारता मुसद्दी राजकारणी टिकू शकत नाही. त्यांना एखाद्या सावदासारखी गाठले जाते आणि हेच या नाटकातून दाखवले आहे.

मार्शिअस याच्या भोवती सर्व नाटकाची कथा फिरते. मार्शिअस  पराक्रमी योद्धा दाखवला आहे. परंतु राजकारणामुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागतो. मार्शिअस हा पराक्रमाच्या जोरावर ऑपिडीयस याच्या सैन्याला परतून लावतो व रोम शहरावर स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करतो. त्याला राजकारणी मोठ्या प्रमाणावर विरोध करत असतात. राजकारणी हे सामान्य नागरिकांना एकत्र करून मार्शिअसच्या विरोधात उभे करतात. मार्शिअसच्या आईला आपल्या बाजूने करून मार्शिअसला ऑपिडीयसकडे शरण जाण्यास सांगतात. मार्शिअस आपल्या आईचे ऐकूण ऑपिडीयसला शरण जातो. पुढे राजकारणी ऑपिडीयसशी हात मिळवणी करून मार्शिअसचे जीवन संपवून टाकतात.

विल्यम शेक्सपियर यांनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी लिहिलेले हे नाटक दिलीप जगताप यांनी मराठीत अनुवाद केले आहे. नाटकाचे दिग्दर्शन रोहित पगारे यांचे होते. नेपथ्य प्रशांत पाटील तर प्रकाश योजना रवी रहाणे यांचे होते. रंगभूषा, वेशभूषा माणिक कानडे यांची तर संगीत सुहास दोंदे यांचे होते. नाटकामध्ये ब्रूटस – पूजा घोडके, सिसिनेयस – अमन शेख, लार्शीयस – प्रशांत पाटील, मेनेनियस – प्रीतम रोकडे, व्हालुमिना – प्रियंका सिंग, सिनेटर – रितेश जगदाळे, ऑफीडियस – रोहित पगारे, मर्शिअस – भरत कुलकर्णी, कॉमीनियस – अझहर सय्यद, नागरिक – सरिता परदेशी, नागरिक – संगीता ससाणे, नागरिक – गजेंद्र कुलथे, नागरिक – निनाद ताजनपुरे यांनी भूमिका साकारल्या.

दिगंबर काकड 
मो-९५९५९९६०३३

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.