नीति व अनीति यावर आधारलेले नाटक “अंतःअस्ति प्रारंभः”
६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र
६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत १८ डिसेंबर रोजी बाबाज् थिएटर्स,नाशिक संघातर्फे अंतः अस्ति प्रारंभः हे नाटक सादर करण्यात आले. प्रत्येक युगान युग चालत आलेला व्यक्तीच्या मनाचे दैत्त्व म्हणजे दोन बाजू असतात. तसच या ब्रम्हांडात नीती, अनीती नावाची पात्र पृथ्वीतलावर येतात. द्वापार युग, त्रेतायुग, कलियुग यामध्ये वेळोवेळी होणारे वैचारिक बदल. त्यानुसार राधाकृष्ण, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अप्रतिमरित्या नाटकात सादर करण्यात आले. कलियुगात होणारे बदल, आजची मानसिकता त्यावर आधारलेले नीती, अनीती विरुद्ध लागलेली पैंज. जेव्हा शेवट होतो ती नव्या पर्वाची सुरुवात असते. यावर नाटकात भाष्य करण्यात आले आहे. नीती अर्थात सत्याचा विजय. यावर आधारलेले नाटक म्हणजे अंतः अस्ति प्रारंभः.
नाटकाचे लेखन आकाश कंकाळ तर दिग्दर्शन आरती हिरे यांच्या होते. अक्षय अहिरराव व यश जोशी यांनी संगीत दिले. नाटकामध्ये शीतल जाधव – गवळण, तेजस्विनी कोपरगावकर – नीती, समूय्या शेख – राणी, श्रावणी जाधव – आम्रपाली, प्रणाली घोडके – गवळण, हर्षदा शिंदे – गवळण, स्नेहल गायकवाड – गवळण, पूजा पाटील – राधा, आचल कुमावत – गवळण, पौर्णिमा शिंदे – गवळण, सौरव आहिरे – कर्ण, अक्षय पवार – महाराजांचा मावळा, ओम तपकी – अनिती, किरण मोहिते – कृष्ण, संकेत म्हस्के – गावकरी, ओमकार गाढेकर – दुत, अर्जुन वाघ – गावकरी, राणी गौंड यांनी भूमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक – पूर्णविराम
संस्था -अथर्व ड्रामॅटीक्स- नाशिक,
लेखक – इरफान मुजावर
दिग्दर्शक :- प्रतीक नाईक