सामाजिक दृष्ट्या आशावादी विचार मांडणारे नाटक ‘चोरिला गेलाय’
६२ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा ,नाशिक - प्रवीण यशवंत
महात्मा गांधी विदयामंदिर नाशिक या संस्थेचे ‘चोरिला गेलाय’हे नाटक सादर झाले.
गावातील श्रद्धेचे स्थान असलेले मारुतीचे मंदिर,त्या तालुक्यातील राजकारण,समाजकारण,अस बरच घडत असत. अशात एक दिवस शनी मारुती मंदिरातील नवसाला पावणारा शनी मारुती गायब होतो त्या मंदिरात ती मूर्ती नसते ‘देव चोरिला गेले की काय’ असे वाक्य येते त्याची गावभर वाच्यता होते गावातील पुढारी,सरपंच,गावकरी आणी एक मोठ्ठा गोंधळ गावभर सुरु होतो, प्रचंड गोंधळ, धमाल सुरु होते, नाटकात फुल्ल मनोरंजन सुरु होते…लेखकाची फँटसी धमाल निर्माण करते त्या पलीकडे काही करत नाही. लेखकाला जे सांगायचंय त्यातून त्यांची माणूस,समाज,पुढारी,सुधारणा,मानवी अंधश्रद्धा याचा युक्तीने सकारात्मक केलेला विचारांची fantasy हा नाटकाचा विषय आहे. घडणाऱ्या या गोंधळाचा उपयोग करून घेणारे पुढारी दिसतात माणसं दिसतात देवाच्या शोधात हारवलेल्या गोष्टीही सापडू लागता ही नाटकाची गोष्ट प्रेक्षकांच प्रचंड मनोरंजन करते..
ज्या दिवशी देव चोरिला जातो त्याच दिवशी त्याच गावातील राजा नावाचा मुलगा बेपत्ता होतो सगळंच गाव देव शोधतय,पुढारी राजकारण करताय,या गोंधळात ती आई आपल्या मुलाला गावाभर शोधतीये पण सगळेच देव शोधण्याच्या गडबडी तिचा बेपत्ता झालेल्या मुलाच कुणी गांभीर्यांनी घेतच नाही, एक आई तिचा मुलगा शोधतीय आणी सर्व गाव देव शोधतय नाटकात इथे जगण्यातील विसंगती (absrdity) समोर येते. लेखक त्या कडे बघतच नाही किंवा त्यांच्या लक्षातही आल नसावं लेखक कृष्णा वाळके त्याची नाटकात मांडलेली कल्पना घेऊन पुढे निघून जातात, नाटक धमाल करते पण नाटकाचा विषय समाधान देत नाही.
आज जे असायला हव होत ते ते नाहीये आणी जे जे नसायला हव होत ते ते आहे.त्यामुळे नेमक जे नकोय ते चोरीला जात आणि जे हवंय ते अखेर सापडत हेच माणून पुढे जाऊ.
दिग्दर्शक स्वप्नील गायकवाड यांची दृश्यांची मांडणी त्यांचा वेग स्पीड प्रेक्षकांना बांधून ठेवत होते प्रत्येक पात्राच्या संवाद स्पस्ट स्वच्छ शेवटच्या रांगेपर्यन्त दिग्दर्शक लेखकाला न्याय देत होता आणि नाटकातील लेखक दिग्दर्शकाला उत्तम साथ देत होते त्याचा उत्कृष्ट पारिणाम नाटक विनोदी पद्धतीने प्रभावी सादरीकरण करत होते.थोडक्यात नाटक रटाळ झाले नाही ही दिग्दर्शकाची उत्तम बाजू.
संगीत संयोजन रोहित सरोदे यांनी केले,नाटकातील लावूड आवाज कर्कश नकोसा वाटतो पण इथ लावूड आवाजही स्टेजवर सुरु असलेल्या दृश्याशी घट्ट coordinate होते तंत्राच महत्व किती गरजेचे हे लक्षात येते.
प्रकाश योजना विनोद राठोड यांनी नाटकाच्या विषयाला साजेसी केली. पण नाटकातील दृश्यात एक वेळ असते तिचा विचार असतो त्या दृश्याचा एक प्रकाश असतो तो विचार एक चांगली कलात्मक निर्मिती साधू शकतो.बाकी विषयानुरूप प्रकाश योजना.
नेपथ्य समाधान मुर्तडक,आनंद गांगुर्डे यांनी यांनी केली
रंगभूषा साक्षी बनकर,प्रतिमा राठोड यांनी केलीवेशभूषा प्रथमेश पाटील,दुर्गेश गायकर यांनी केली.
कलावंत – हनुमंत्या ची भूमिका करणारे स्वप्नील गायकवाड तसेच,जयराम कुंदारिया,साक्षी बनकर, कृतिका कागलकर,आर्यन जाधव,समाधान मूर्तडक, आनंद गांगुर्डे,प्रवीण जाधव,काजल खैरणार,शिवानी कौशल,प्रथमेश पाटील,प्रतिक बर्व,संकेत पगारे,योगेश साळवे,दीपाक्षी नागपूरे,दुर्गेश गायकर,सतीश घुगे,विकास जाधव,अशोक चादवडे,योगेश राठोड,प्रकाश गोसावी ओम पऱ्हे,चंदना चादोडे,गुलाल गुप्ता,कृष्णा शिरसाट या सर्व कलावंतांनी संपूर्ण नाटक जिवंत केले त्यातून एक दणदणीत सादरीकरण प्रेक्षकांना बघावयास मिळाले.
लेखक – कृष्णा वाळके
दिग्दर्शक स्वप्नील गायकवाड
संगीत संयोजन -रोहित सरोदे
प्रकाश योजना – विनोद राठोड
नेपथ्य – समाधान मुर्तडक,आनंद गांगुर्डे.
रंगभूषा – साक्षी बनकर,प्रतिमा राठोड.
वेशभूषा – प्रथमेश पाटील,दुर्गेश गायकर.
विशेष मार्गदर्शक – प्राचार्य डॉ संपदा हिरे,प्रा प्रवीण जाधव.
प्रवीण यशवंत
मोबाईल – ७७६७८९४४३५
