वृद्धाच्या समस्येवरच हलकं फुलकं नाटक “अभी तो मे जवान हु”

६२ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नाशिक -प्रवीण यशवंत

0

मथुरा बहुद्देशिय विकास मंडळ नाशिक या संस्थेने “अभी तो मे जवान हू” हे नाटक सादर केले
वृद्धांच्या एका समस्येवर नाटकाची गोष्ट आहे वृद्धांना जाणवणारा एकटेपणा,निराशा,थोडक्यात आजच्या बदलत्या वेगवान जीवनात वृद्धांकडे बघायला वेळ नाही,जन्मदिलेली  मुलच त्यांना रस्त्यावर सोडून निघून जाताता.कधी मुलांचाही नाईलाज असतो इच्छा असूनही त्यांना आई वडिलांची काळजी घेता येत नाही पण या नाटकात वृद्ध आबा देशमुख या वडिलांसाठी स्वता त्यांचा मुलगा त्यांच्या साठी जोडीदार शोधून लग्न लावतो  हे वृद्धांविषयी नाटककार आपले विचार मांडतो.

आपला जोडीदार हयात नसेल तर एक निराशा,एकटेपणा,उदासीन्य परिस्थिती आत निर्माण होते या परिस्थितीत त्याचे कुटुंब त्या अवस्थेकडे कस बघत त्याच त्यांना भान किती त्या साठी काही करण्याची त्यांची तयारी किती,

"Abhi To Me Jawan Hu" is a light play on the problem of the elderly.

हे त्या कुटुंबातील सदस्याच्या नात्यातील भावना,विचारांवर अवलंबून असते. नाटकातील कुटुंबातील वृद्धाचे कुटुंब सदस्य हे सकारात्मक विचारांचे लेखकाने मांडले आहे वृद्धांचा मुलगा,सुन,नातू हे आता आजोबासाठी,सासऱ्या साठी,वडिलांसाठी बायको शोधतात या शोधात घडणाऱ्या सर्व विनोदी घटना,प्रसंग संपूर्ण नाटकाचा विषय आहे जो त्यांनी फारच उथळ पणे मांडलाय,लिहलाय,वृद्धाची एखादी अवस्था मांडुन त्या भोवती अतिशय फिल्मी अशी मांडणी केलीय,वृद्धाच्या अवस्थेवर तुम्ही मनोरंजनाचा डोस देऊन लेखकाला अपेक्षित परिणाम साधता आला असता ते नाटकात होत नाही  लेखकांनी याचा विचार करायला हवा. आपल्याला सांगायचे काय ? आणि का ? याचा प्रामाणिक विचार आपला सर्वच आव गाळून टाकतो.

वृद्धांच्या अवस्थेवर ‘अभी तो मे जवान हू’  हेमंत गवळे यांनी दिग्दर्शन आणि  या नाटकाचे लेखन  केलय आपल लिखाण उत्तम की दिग्दर्शन की स्टेजवरच आपल काम याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा हा आत्मविश्वास नाटकाच्या टीमला सादरीकरणात विषयाच्या अंगाणे  योग्य तो परिणाम साधान्यासाठी  मारक ठरवू शकतो.कारण समोरचा प्रेक्षक ‘अभी तो मे जवान हु’ अस कोण म्हणतय तर आजोबा मी अजून जवान आहे अस त्यांना का वाटत साधारण नाटक बघताना असा विचारांची एक लिंक असते त्यात इथं सगळं ढोबळ स्वरूपात समोर येते प्रचंड लावूड संगीत,डेकोरेशन सारखी कलरफूल प्रकाश योजना हे नाटकाच्या विषयाला बाधक आणि वृद्धाला हास्यास्पद करत होते. अस वृद्धत्व तर तरुणाला ही हवंस वाटेल या तंत्रामुळे नाटकातील वृद्धाची अवस्था,प्रश्न,एकटेपण,वाटणारी करुणा समोर आलीच नाही, कलर फुल प्रकाश योजना असूद्या पण वृद्धाविषयी बोलणारी हवी तेच संगीत संयोजना बाबतीत या सर्वांचा कंट्रोल म्हणजे दिग्दर्शक इथे लक्ष गरजेचे वाटते

नेपथ्य रामेश्वर जाधव यांनी केलंय चकचकित आणि  कलर फुल नेपथ्य बघताना व्यावसायिक नाटकाचा सेट वाटतो जो विषयाला साजेसा होता.
संगीत संयोजन रोहित खैरनार यांनी केलंय अतिशय सफाईदार पण काही ठिकाणी लावूड वाटले त्यांच्या समोर नाटकाचे जे सादरीकरण झाले त्याचे अप्रतिम संगीत संयोजन केलंय रोहित खैरनार  यांनी.

"Abhi To Me Jawan Hu" is a light play on the problem of the elderly.

प्रकाश योजना विनोद राठोड यांनी केलीय नाटकाच्या विषयाला अनुरूप होती पण काही ठिकाणी कारण नसताना वापरलेला लाईटचा कलर,वापरलेल्या स्पॉट ची जागा उगाच भारी दिसत म्हणून करणे चुकीचे आहे . त्यातून लेखक काही सांगू पाहतोय प्रकाश योजना पण सांगू शकते हिच कला. बाकी सफाईदार प्रकाश योजना विनोद राठोड यांची.

वेशभूषा संकेत चव्हाण यांनी उत्तम केली विशेषता वृद्ध व्यक्ती अप्रतिम डिटेलिग चव्हाण यांचे.
रंगभूषा ललित कुलकर्णी यांनी उत्तम केली.

आबा देशमुख ची भूमिका करणारे कैलास जाधव वृद्ध वाटतच नव्हते पण त्यांचा आंगिक अभिनय विनोद निर्माण करत होता आणि  मुख्य विषयानुरूप समस्या असणारे आबा देशमुख हा वृद्ध हारवत होता त्यांनी साकारलेला वृद्ध परिणाम कारक नव्हता पण मनोरंजन  करणारा होता बाकी उत्तम.

अतुल गायकवाड यांनी धनराज देशमुख यांची भूमिका केली फारच सुरेख केली तो एक नवरा वाटला,बापही वाटला,आणि  वृद्ध देशमुखांचा मुलगा ही वाटला हे सगळे भाव अतिशय संयमी आणी उत्तम अभिनयानी साकारले.

सायली निकम यांनी अनिता देशमुख बायको,सून,आई या भूमिका सुंदर साकारल्या ,मुकुंद भड ही भूमिका नयन देशमुख यांनी खणखणीत केली उत्तम काम…हेमंत गवळे  कोकरोच सूत्रधार उत्तम साकारलाय

कलावंत –
कैलास जाधव,
अतुल गायकवाड,
सायली निकम,
मुकुंद भड,
मंजुषा ठाकरे,
रसिका देशपांडे,
साईप्रसाद शिंदे,
पूजा चव्हाण ,
तनिषा जाधव,
संस्कृती गायकवाड,
हेमंत गवळे
या सर्व कलाकार उत्तम काम करत होते.

प्रवीण यशवंत 
मोबाईल – ७७६७८९४४३५

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!