नियती ही सर्वव्यापी आहे हे दाखवणारे नाटक “आवर्तन” 

६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र 

0

६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ८ डिसेंबर रोजी लोकहितवादी मंडळ, नाशिक संघातर्फे आवर्तन हे नाटक सादर करण्यात आले. नियती सर्वव्यापी आहे. तीनही काळामध्ये तिच्या अस्तित्व असते, असे अनेक जण मानतात. कोकणातील एक सधन कुटुंबातील ही गोष्ट आहे. भूत, वर्तमाना आणि भविष्यातही वंश अखंडित राहण्यासाठी नाटकातील व्यक्तिरेखा परिस्थितीला पर्यायाने नियतीला शरण जाताना दिसतात. किंबहुना नियती हे घडवून आणते. व्यक्तिरेखांमधील मानसिक ताणतणाव, भावनिक कल्लोळ, स्त्रियांची कुतरओढ आवर्तन या नाटकात दाखवण्यात आली आहे.

गावातील एक दारुडा त्याच्या पत्नीला त्याच्या जाचातून सोडवण्यासाठी पंत यांच्या वाड्यावर आणतात. पंतांचा व यशोदेचा अनावधानाने शारीरिक संबंध येतो. किंबहुना नियती ते घडवून आणते. त्या संबंधातून वर्तमानातील कुसुम जन्म घेते. गावात या गोष्टीचा ब्रभा होऊ नये म्हणून गावातील सदा ह्या इसमास पैसे देऊन प्रकरण मिटवतात. पंतांची पत्नी पार्वतीची एक परस्री घरात आल्यामुळे घुसमट होते. पार्वती असह्यापणे परिस्थितीला सामोरे जाते.

अत्यंतिक विचाराने आजारी होऊन मरण पावते. या धक्क्याने पंत भ्रमिष्ट होतात. पंतांचा मुलगा आबा शहरात शिकायला असतो. तरुणपणी त्याचे लग्न नर्मदेशी होऊन तो कोकणातल्या घरात पत्नी सोबत राहत असतो. अनेक प्रयत्न करूनही नर्मदेला मूल होत नसते. आबांची चिडचिड वाढत असते. कुसुम घराशी असलेले संबंध कायम ठेवते. पण आबासाहेबांमुळे वाड्यावर तिचे येणे जाणे कमी असते. कुसुम आबांचे सावत्र बहीण. ती वाड्यावर आलेली आबांना आवडत नसते.

आबांच्या पत्नीला नर्मदेला घरातील बऱ्याच गोष्टी माहित नसतात. त्या गोष्टी तिला आबा सांगत नाहीत. पण कुसुमच्या भेटीत नर्मदेला वाड्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळतात. तिचे सासरे पंत यशोदेशी त्यांचा असलेला शारीरिक संबंध, त्यातून तिचा झालेला जन्म, काली मातेची मूर्ती इत्यादी. पंतांचा मुलगा आबा, याचे गावातील एक शस्री राधा हिच्याशी संबंध निर्माण होतात. त्याला आबाची पत्नी नर्मदा हिचा विरोध असतो. पण ती ही शेवटी त्रिकाल ज्ञानी असलेल्या साधूच्या सांगण्यावरून नियतीशी प्रतारणा करू शकत नाही व परिस्थितीला शरण जाते. साधू तिला तू नियतीच्या कार्यात ढवळ करू नको, त्याचे विपरीत परिणाम होतील असे सांगतो. राधेशी नियोक्रिया करण्यासंबंधी आबांना नर्मदा परवानगी देते. राधा आणि आबासाहेबांच्या संगमनातून नवीन बाळाचा जन्म होतो या प्रकारे आवर्तन पूर्ण होते. नाटकातील सर्व व्यक्तिरेखा नियतीच्या हातातील बाहुले झालेल्या व परिस्थिती पुढे हातबल झालेल्या दिसतात.

नाटकाचे लेखन अक्षय संत तर दिग्दर्शन आनंद कुलकर्णी यांचे होते. नेपथ्य आदित्य समेळ व प्रकाश योजना सागर पाटील यांची होती. पार्श्वसंगीत अमेय जोशी वेशभूषा अपूर्वा शौचे बागुल यांची होती. रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकामध्ये दासोपंत – मिलिंद कुलकर्णी, आबा – सागर संत, नर्मदा – रोहिणी जोशी साधु – सतिश मोहोळे, कुसुम – आर्या शिंगणे, पार्वती मधुरा बुवा, सदा – ईश्वर घोलप, यशोदा – करिश्मा मोरे, महादू – तेजस मोहिते, राधा – मोनिका चौधरी यांनी  भूमिका साकारल्या.

दिगंबर काकड    
मो-९५९५९९६०३३   

आजचे नाटक -राहिले दूर घर माझे
संस्था – क्रांतिवीर कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र मंडळ, नाशिक,
लेखक – शफाहत खान, 
दिग्दर्शक – सनी धात्रक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!