संत बसवेश्वर यांच्या सामाजिक रूढी सुधारणाची संघर्ष गाथा “बसवानुभव”

६२ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा,नाशिक- प्रवीण यशवंत

0

श्री शिवछत्रपती कला व क्रिडा सांस्कृतिक केंद्र नाशिक या संस्थेने “बसवानुभव” हे नाटक सादर केले. संत बसवेश्वर यांच्या सामाजिक,रूढी सुधारणाची संघर्ष गाथा “बसवानुभव”बसवानुभव ही कथा बसवेश्वर यांचा जीवनपट सांगते. ही मूळ कथा अतिशय सुंदर मांडलीय राजेंद्र पोळ यांनी. जात,धर्म,वर्ण,विरहीत समाज रचना स्थापण्यासाठी त्यांनी केलेला आणी उभारलेला संघर्ष,त्यांचे जीवन, समाजाप्रती बसवेश्वरांचे त्यांचे कार्य अप्रतिम मांडले राजेंद्र पोळ यांनी.

यातील बसवेश्वरांच्या लहान असतानांचा त्यांचा प्रसंग फार प्रभावी लिहलाय लेखकाने,बसवेश्वराने आपल्या लहानपणी आपल्या मुंजीच्या वेळीी वेगळाच हट्ट धरला नागलांबीका  बसवेश्वरांची मोठी बहीण माझ्याआधी नागलंबीकेची मुंज करा, माझ्यापेक्षा मोठी आहे ना ती! बाल बसवेश्वरांच्या या बोलण्यात  सारेच अचंबीत झाले मुंजीला जमलेल्या सगळ्या  पुरोहितांना आश्चर्याचा धक्काच बसला याआधी असं कधीच झालं नव्हतं एका ज्येष्ठ पुरोहितान सांगितलं हे बघ बाळ बसावान्ना आपल्या धर्मात मुलीची मुंज करत नसतात त्यावर  बसवेश्वर ताडकन म्हणाले मुंज हे पवित्र कार्य आहे ना ?  माझी बहीण पवित्र नाही ? तिची मुंज करत नसाल तर मी माझी मुंज करून घेणार नाही.

(हा नाटकातील सुरुवातिला सादर झालेल दृश्य विषयानुरूप होता. बसवेश्वराची भूमिका करणारा बाल कलाकार यांनी सुंदर काम केले. इथे नाटक संपले असते पडदा पडला असता तरीही चालले असते, पुढे मोठया कलावंताना  व नाटकात काम करत असलेले दिग्दर्शक त्यांची सर्व टीम यांना कणभरही पाठांतर नव्हते,नाटकाची काय अवस्था केली असेल ते वाचकाच्या लक्षात येईलच.)

नाटक सुरु होताच पुढच्या विस पंचवीस मिनिटात पहिला अंक संपला एक परीक्षक प्रेक्षगृहातूनच म्हणाले पडदा देऊ नका नाटक सुरु ठेवा त्यांची सूचना मला महत्वाची वाटते.पण सादारकर्त्यांनी काही तयारी साठी कर्टन दिला…

नाटक सादर होताना तालमी कमी झाल्यामुळे काही आडचणी येतात वाक्य बोलताना आडखळणे,विसरणे,तांत्रिक अडचणी हे प्रेक्षकही समजू शकता, काहीच, कुठलीच तयारी नसताना राज्य नाट्य स्पर्धेत जेव्हा एखादी संस्था नाटक सादर करते त्याच फार वाईट वाटते.

दिग्दर्शन चंद्रवदन दीक्षित यांनी केले, त्यांना नाटक भावले त्यांनी सादर करायला घेतले पण त्याच एक टीमवर्क असत,नाटकाच्या तालमीना खुप वेळ द्यावा लागतो दिग्दर्शक आणी नट म्हणून आपल्या सहित सर्व कलावंताचे  पाठांतर झाले पाहिजे दिग्दर्शक आणी टीम म्हणून यांना कुणालाही हे गांभीर्य कुठेच नव्हते ? मग या संस्थेने हे नाटक का सादर केले ?…यात नाशिक सेंटर च्या दर्जाचाही प्रश्न आहे हे सर्व सादर कर्त्या कलावंताचीही जबाबदारी आहे हे समजून घेतले पाहिजे, आपल्या समोर आपल्या शहरातील प्रेक्षक असतात,बाहेरून आलेले परीक्षक असता…हा दर्जा आपण सर्व रंगकर्मिनी सांभाळला पाहिजे टिकवला पाहिजे…

यातील सर्व कलावंत नवीन होते कुठल्याही कलावंताना त्यांचे डॉयलॉग पाठ नव्हते स्टेजवर कधी यायचं आणि प्रवेश घेतल्यावर कधी जायचे त्यांना अजिबातच माहित नव्हते एकमेकांना विचारून एंट्री,एक्सिट घ्यायचे ? ते ही स्टेजवर!.. तर मग नाटक पुठे कसे गेले ? तर ते सर्व रेकॉर्डेड होत त्यातही सुसूत्रता नव्हती…असे कुठलीच तयारी नसलेले नाटक सादर न होणे हे अनेक अर्थाने महत्वाचे होते.
( राज्य नाट्या स्पर्धेत नाटक सादर करणाऱ्या कुठल्याही संस्थेची प्राथमिक तयारी म्हणजे  प्रेसनोट तयार करणे आणी संबधित लोकांना देणे.

प्रेस,नाट्यअभ्यासक,परीक्षक त्यांना सुद्धा पात्रपरिचय नाटकाची माहिती सादर कर्त्यांनी दिली नव्हती,मी स्वता पात्र परिचय घ्यायला गेलो तर काहीच नव्हते त्यांच्या कडे, समन्वयक श्री राजेश जाधव मला म्हणाले त्यांनी परीक्षकानांही दिली नाही असे सांगितले, तर नाटकाच्या संबधित एका लेडीज ने मला पात्र परिचय लिहून दिला त्याचा मी फोटो घेतला आणी नाटकाच्या बोर्डचा फोटो त्यांनी दिला परीक्षाकांकडे पात्र परिचय नसेल तर ते नाटक बघताना कस ठरवणार नाटक कसही असो त्याचा रिमार्क असतोनां हे सादर कर्त्या टीमने गांभीर्याने समजून घेतले पाहिजे.)

या संस्थेने आणी कलावंतानी पुढच्या वर्षी खुप गांभीर्याने,जोमाने नाटक सादर कराव त्यासाठी खुप नाटक ,एकांकिका बघा,वाचा आणी नाटक करा आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

दिग्दर्शन – चंद्रवदन दीक्षित
प्रकाश योजना – दिनेश चौधरी
संगीत संयोजन – विक्रम दीक्षित.
नेपथ्य,वेशभूषा – राजेंद्र झालटे
रंगमंच व्यवस्था – सुनील सूर्यवंशी

कलावंत
चंद्रवदन दीक्षित,दिलीप छाजेड,बाल कलाकार नयन गायकवाड, प्रदीप कुलकर्णी,सतीश गोन्हे, राणी टाकतोडे,प्रा निलेश जाधव,श्रेया शेजूळ,

नाटक अतिशय गांभीर्यांनी करण्याची गोष्ट आहे तिची तयारी ही मला कायम महत्त्वाची गोष्ट वाटते, रंगकर्मीनी समजून घेतली पाहिजे. आपल आयुष्य घडवताना आपण शिक्षणाला महत्त्व देतो तिथे सीईटीच्या परीक्षा देतो पण नाटकाची सीईटी नको द्यायला  ? तयारी करायला नको…नाटकही आयुष्य घडवते!..

प्रवीण यशवंत
मोबाइल – 7767894434

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.