जाती व्यवस्था,शोषण यांचे बदलते स्वरूप.’विदूषक’

६२ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नाशिक-प्रवीण यशवंत 

0

लेखक – प्रभाकर दुपारे
दिग्दर्शक – मार्टिन
हार्ट्स बीट्स बहुऊद्देशिय विकास संस्था -धुळे

या संस्थेचे ‘विदूषक’ हे नाटक स्पर्धेत सादर झाले.जात व्यवस्था आणी शोषण यावर नाटकार संवाद साधातो नाटकातून पहिल्या अंकात ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबात नुकताच एक बाळ जन्माला आलेलं असते पण गावातील धार्मिक अंधश्रद्धा,गावात न पोहचलेलं शिक्षण त्यातून त्यांच शोषण अभावी दारिद्र आणी उद्दवस्थ झालेली कुटुंबा पैकी  पार्वती व तिच्या नवऱ्याची गोष्ट पार्वतीच नुकतेच जन्माला आलेलं  तान्ह बाळ ते आजारी असताना त्या साठी गावातील भटाने  पार्वतीला  गावातील मंदिरावर २५ किलो सोन्याचा कळस चढविण्यास सांगतो नाहीतर तुझे बाळ संकटात येईल आणि त्याचा मृत्यू ही होऊ शकतो पार्वती हादरून जाते मजुरी करणारा,डफ वाजवत फिरणारा तिचा नवरा या गोष्टी काही मानत नाही पण आईच्या ममत्वा समोर तो काही बोलू शकत नाही पण तोही घाबरलेला असतो प्रचंड दयनीय अवस्थेत पार्वती आपलं राहती खोपी आणी थोडी जमीन सावकाराला विकते त्यातून सोन्याचा कळस येतो भटजी यथायोग्य मंत्रौपचार कळसाची पूजा करतो पार्वती समोर बसलेली मांडीवर तिचे बाळ आता भट कळस तिच्या हातात देतात तो घेऊन ती मंदिराच्या पायऱ्या चढत असता ते बाळ तिच्या हातातून खाली पडते आणी कळसही त्यात बाळाचा मृत्यु होतो भट कळस घेऊन पलायन करतो पहिल्या अंकात प्रेक्षकांन समोर येणारे हे दृश्य अतिशय प्रभावी सादर केल तुम्हाला काहीतरी कन्व्हेन्स करत अस फिलींग असणारे हे दृश्य प्रसंग क्रमांक दोन गर्भवती असलेला स्त्रीला भटाने सांगितलेला तोडगा २१ ब्राम्हण जेऊ घालण्याचा अतिशय गरीब कुटूंबाला ही व्यवस्था करताना नाकीनऊ येते जे कुटुंब मुळातच हालाकीच्या अवस्थेत आहे.

Maharashtra State Drama CompetitionChanging form of caste system, exploitation. 'Vidushak'

हे कुटुंब त्या २१ ब्राह्मणाची जेवायची व्यवस्था करता त्याची भाबडी आशा आपल्या जेवणाची व्यवस्था पण त्यातून होईल पण त्यांची निराशा होतो भटाची बायको म्हणते २१ ब्राम्हण म्हणजे २१.या प्रसंगातून भूतकाळातील ग्रामीण भागातली अवस्था आणि व्यवस्था.जोतिषी,भट,मांत्रिक यांची उदर निर्वाहाची साधन हिच मंडळी होती हे समोर येत.वरील दोनही प्रसंग पहिल्या अंकातील.

अंक दुसरा या अंकात विदूषक नाटकाची गोष्ट सांगतो आजच्या काळात बदललेल्या समाज व्यवस्थेत बदललेलं शोषणाचा आणि जातपात मानण्याच स्वरूप  मंचावर घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात दृश्यात विदूषक एका प्रकारे भाण देऊन जातो.उदा.शिक्षण सम्राट असलेल्या पुढऱ्याची मुलगी व्यवस्थेवर कविता करणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडते जो बहुजन समाजातील आहे आणी पुढे त्याचा झालेला खून जात व्यवस्थचे बदललेले स्वरूप आहे का हे नाटककार प्रभाकर दुपारे नाटकातून बोलता.

विदूषक जर नाटकाचे नाव आहे तर तो पहिल्या अंकात का नाहीतर्काच्या अर्थाने…(तिथे विदुषकाला जास्त काम होते ?) पण नाटकातून लेखकाचा हेतू साध्य होतो त्याच्या विचार पूर्वक मांडणी मुळे.
दिग्दर्शक – मार्टीन यांचं दिग्दर्शन नाटकातून एक परिणाम साधण्याचा त्यांचा प्रयत्न साध्य होतो,अप्रतिम अस दिग्दर्शन मात्रविदूषक या पात्रावर त्यांची काम करण्याची खूप गरज आहे त्या मुळे सादरीकरणात लेखकाला ही न्याय मिळेल.अनुभवी नट मंडळी जेव्हा मंचावर चुकीचे काम करता त्या वेळेला बोगस काम केल अस बोलल्या जात पण नट मंडळी नवीन असेल अनुभव नसेल तर त्यांना बोगस काम केल अस म्हणणं चुकूचे ठरेलं,आपण एका राज्य स्तराच्या स्पर्धेत काम करत आहोत पासून तर स्पर्धेतील नाटक संपेपर्यंत दिशा देणारा हा दिग्दर्शक च असतो याचा दिग्दर्शकाने पुढच्या प्रयोगाला विचार करावा .

बाकी सर्वच प्रसंग दिग्दर्काने उत्तम बांधनी केलीय काम करणाऱ्या कलावंतावर काम गरजेचे आहे संपूर्ण नाटकात दिग्दर्शक मार्टीन यांची मेहनत प्रामुख्याने जाणवते.

संगीत संयोजन -अभया आहिररावं यांनी उत्तम संगीत संयोजन केलंय प्रत्येक प्रसंगातील योग्यतोच परिणाम साधत होता पण नाटकातील काही मोठे ब्लॅक आऊट मध्ये त्यांनी संगीताचा वापर करायला काहीच हरकत नव्हती त्याचा परिणाम नाटकाच्या वेगावर झाला जो परिणाम साधण्यासाठी महत्वाचा असतो.

प्रकाश योजना -एडविन मलबारी यांनी प्रकाश योजना केली होती जिला काही लॉजिकच नव्हते पण नाटक पुढे नेत होती लाईट्स वर दिग्दर्शकाच लक्ष हव.

Maharashtra State Drama CompetitionChanging form of caste system, exploitation. 'Vidushak'

नेपथ्य – निलेश तेलंग यांनी नेपाथ्याची बाजू सांभाळली विचार पूर्वक कथानकाला साजेस अस सुंदर नेपथ्य निलेश तेलंग यांनी केल.
वेषभूषा – पूजा खैरनार यांनी केलीय नाटाकाच्या आशयानुरूप त्यांनी वेशभूषा केली जी उत्तम होती.
रंगभूषा – माणिक कानडे,भगवान नवसारे यांनी केली.
लेखक- प्रभाकर दुपारे
दिग्दर्शक – मार्टीन सुभाष खैरनार
संगीत – अभया अहिरराव
नेपथ्य – निलेश तेलंग प्र
प्रकाश – एडविन मलबारी
वेषभुषा – पूजा खैरनार
रंगभूषा – कानडे कानडे,भगवान नवसारे
कलावंत – विशाल महाले,रोहित लोहार,गायत्री लोखंडे,दिनेश सोनवणे,प्राची पाटील,सुशांत यादव,कल्याणी कचावाह,अक्षय मालुसरे,सोमेश्वर हिरे,यश मोहिते,तुशार सातपुते,रोहित पाटील,मोनीश वाडेकर,विशाल आहिरे,रोहित आहिरे,रितेश लोहार,स्वाती देव,निकिता पवार,हर्षल सोनवणे विनोद फर्ताले यांनी काम केले.
प्रवीण यशवंत 
मोबाईल – ७७६७८९४४३५

आजचे नाटक
२६ नोव्हेंबर २०२३
प्रथम पुरुष
कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय नाशिक
प सा नाट्यमंदिर सायंकाळी – ७ वाजता

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.