समाज व्यवस्थेवर भाष्य करणारे नाटक चेहरा मोहरा…

६३ वी मराठी राज्य नाट्य स्पर्धा,नाशिक केंद्र 

0

६३ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेत १ डिसेंबर २०२४ रोजी नम्रता कलाविष्कार संस्था, नाशिक संघाकडून चेहरा मोहरा हे नाटक सादर करण्यात आले. वर्णभेद, मालक आणि कामगार, सामन्या जनता आणि भांडवलदार मालक वर्ग, व्यवस्था आणि समाज यावर भाष्य या नाटकात केले आहे. नाटकातील पात्रांचे वेगवेगळे भावजीवन आहे. छोटी छोटी स्वप्न आहेत. प्रत्येक पात्राच्या वागण्याच्या स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. या सर्वांना मूर्त रूप देताना जी आनंदायी अनुभूती मिळते ती या नाटकात आहे. या नाटकात नवीन कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चुकून अपराध घडणे एक क्षमा करण्यासारखी गोष्ट असते. पुन्हा त्या अपराध्याला सुधारण्याची संधी देणे हे सुद्धा अशावेळी आवश्यक ठरते. मात्र काही लोक गैसमार्गांनी मोठे होतातच पण त्यानंतर त्या मोठेपणाची झूल मिरवतांना त्यांना सर्वांना फक्त वापरून घेण्याची सवय लागते. आपल्या उत्कर्षाकरिता ते इतरांना किड्या मुंग्यांसारखे चिरडायला मागे पुढे पाहत नाही. ही वृत्ती आज प्रचंड वाढलेली दिसते. या वृत्तीपुढे आजची व्यवस्था सुद्धा झुकते आहे हे जागतिक सत्य चेहरा मोहरा नाटकामध्ये मांडलेले आहे.

चेहरा मोहरा या नाटकात एक बडा उद्योगपती जयपाल महाजन यांचे दहशतवादी अपहरण करतात.ज्या गाड्यांमधून त्यांना पळून नेले जात असते, त्या गाड्यांचा भीषण अपघात होतो. योगायोगाने अपघात स्थळी जयपाल महाजन यांच्या फॅक्टरीतील एक कामगार अनंत सामंत त्यावेळी तिथे हजर असतो. तो कर्तव्य भावनेने एका सामान्य माणसासारखा अपघातातील सर्वांना मदत करून वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यातच ओळखू न येणे इतपत भाजलेल्या चेहऱ्याच्या, मार लागलेल्या जयपाल महाराजांनाही तो वाचवतो. पेटलेल्या महाजनला विजवण्यासाठी आपल्या अंगातील जॅकेटचा उपयोग करून त्याला वाचवतो. त्याच्या पाकिटात गुंडाळून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. आपण पोलिसांच्या नसत्या लफड्यात अडकलेला नको म्हणून तो तिथून पळ काढतो. मात्र हॉस्पिटलच्या डॉक्टरांना जॅकेटच्या खिशात सापडलेला आयडेंटि कार्ड इ. च्या आधारे चुकीने जयपाल महाजनला त्यांच्याच फॅक्टरीतील कामगार अनंत सामांतचा चेहरा प्लास्टिक सर्जरी ने देतात आणि मग या दोन सारख्या व्यक्तींमुळे आनंत सामांतची पत्नी सुमा, मैत्रीण रूपा यांच्या जीवनात काय काय घडते. जय पाल महाजन यांच्या दहशतवाद्यांनी केलेल्या अपहरणाचा तपास करणारे पोलीस इन्स्पेक्टर, पोलिस, गुप्तहेर एजंट यांना तपासात काय सापडते ? वॉर्डबॉय डॉक्टर व न्यायाधीश यांचे काय होते ?  ते नेमके काय करतात ? आदी प्रश्नांची उत्तरे नाटकात मिळतात.

नाटकाचे लेखन प्रा. दिलीप जगताप यांचे होते. दिग्दर्शन राजेश टेकाकर यांनी केले आहे. नेपथ्य विक्रम गवांदे, वेशभूषा सोनाली गायकवाड व संगीत ओम देशमुख यांनी केले. रंगभूषा माणिक कानडे व प्रकाश योजना विनोद राठोड यांचे होते. या नाटकाची निर्मिती रवींद्र ढवळे यांनी केली असून सूत्रधार नंदकुमार देशपांडे होते. या नाटकांमध्ये अनंत सामंत व जयपाल महाजन हे पात्र सुयोग कुलकर्णी यांनी साकारले. सुमा – अपूर्वा नाईक, रूपा- सृष्टी शिरवाडकर, डॉक्टर- सचिन दलाल, जज्जा- कैलास डिडवाणी, गुप्तहेर एजंट- अरुण भावसार, पोलीस- लक्ष्मीकांत पवार, वॉर्डबॉय- सुगतकुमार साळवे, इन्स्पेक्टर- राजेश टाकेकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.

दिगंबर काकड    
मो-९५९५९९६०३३   

आजचे नाटक – दिल्लीची किल्ली 
संस्था – कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय,नाशिक , 
लेखक -मछिंद्र मोरे 
दिग्दर्शक – नागेश ध्रुव्रे 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.