मजुरांच्या जगण्यातील दाहकता “काळोख देते हुंकार”

६२ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नाशिक -प्रवीण यशवंत

0

संवर्धन बहुुद्देशिय सेवाभावी संस्था नाशिक निर्मित यांचे “काळोख देते हुंकार ” हे नाटक सादर झाले.हात मजुरी करणाऱ्या दोन मजूर कुटुंबांची गोष्ट नाटक सांगते.असंख्य मजुरांच्या जगण्याच आणी परिस्थितीचे प्रतिनिधित्व करणारी दोन कुटुंबाची गोष्ट “कालोख देते हुंकार”

दिलीप परदेशी यांचे हे नाटक लिखाणाचा काळ १९७८ हा आहे आणी प्रथम आवृत्ती १९७९ मेहता पब्लिशिंग ने प्रकाशीत केली त्या नंतर पुढील दहा वर्ष माहाराष्ट्रातल्या राज्य नाट्य स्पर्धेतून हे नाटक सातत्याने विविध केंद्रातून सादर झाले. महाराष्ट्रातल्या  सर्व रंगकर्मीना परिचित असे हे दिलीप परदेशी लिखित “काळोख देते हुंकार” या नाटकाचाआज ५० वर्षानंतर २०२३ मध्ये आपल्याला हे नाटक सादर होताना दिसते त्याच कारण ते आजच्याही रंगकर्मीना भावते त्यात माणसाने, व्यवस्थेने निर्माण केलेली परिस्थिती आजही तशीच आहे. नाटकातील शोषण,मरण,महागाई,अंधश्रद्धा हे भीषण परिस्थिती निर्माण करतात त्यात माणसं मरतात शरीराने,मनाने.

या अशा अनेक प्रसंग,घटना,प्रश्न आजही आपल्या समोर येतात पण त्या प्रश्नांकडे बघण्याचे मन आता आपल्या कडे  नाही इतके आपण या जागतीकरणाच्या वातावरणात गुरफटलो आहे.
म्हणून पाच दशकानंतरही हे नाटक सादर होतय एक दिग्दर्शक ते रंगमंचावर घेऊन यतो सादर करतो ही कला आणी कलावंताची ताकद आहे जी सामाजिक भूत,वर्तमानाचे भान देते समृद्ध करते.दृष्टी तयार करते. अस वाचलंय कि कुठलाही देश,नाट्य तेथील माणसं,राजकीय,सामाजिक परिस्थिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तेथील कला बघा,नाटक,सिनेमा,साहित्य, शिल्प,चित्र त्यात्या देशातील भूत वर्तमानावर व्यक्त झालेल्या असतात.

स्पर्धेतील नाटक बघताना तुम्हाला ते भाराऊन टाकत नाही,समोर येणारी दृश्य फ्रेश वाटणार नाही तुमच्या मनाला रमवणार नाही आपल्या सवयीचे नाटक बघण्याचे लाड पुरवणार नाही. पण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण अंतर्मुख होतो.

महागाईच्या कचाट्यात सापडलेला समाज शिक्षणा अभावी जीवनात पसरलेला अंधकार त्यातून आज्ञान,अंधश्रद्धा यांना बळी पडलेली सामान्य गरीब जनता.रोजगार मिळत नाही म्हणून हातबल झालेला कुटुंब प्रमुख व्यसनाने झालेली कुटूंबाची दुर्दशा एक अर्धांगिनी आणी मुलाची आई म्हणून प्रपंच चालवता यावा ही मरणप्राय  धडपड असेच गरिबीने पोळलेल्या कुटुंबाच्या  सौरक्षणासाठी आणी भुकेला व्याकुळ झालेल्या मुलांना दोन घास खाऊ घालण्यासाठी स्वताहाच शील विकणारी आई,कुटुंबाला आपत्य नाही म्हणून पत्नीच्या आजार पणासाठी पैसा हवा म्हणून कुटुंबा नियोजनाची  शस्त्रक्रिया करून घेण्याची मानसिकता,कुठल्याही प्रकारे रोजगार मिळावा या साठी प्रसंगी अंधश्रद्धेला बळी पडणारे गरीब कुटुंब ,तसेच या सर्व परिस्थितीचा गैरफायदा घेणारे समाजातील राजकारणातील,ठेकेदारांच्या पाशवी छळाने हैराण झालेल्या कुटुंबाची  समाजातील धगधगणारी  दाहक वास्तवाता “काळोख देते हुंकार”या नाटकातून आपल्या समोर येते.

दिग्दर्शन दिलीप काळे यांनी केले प्रत्येक दृष्य अतिशय संवेंदनशीलतेने त्यांनी हाताळले ते प्रभावी मंचावर सादर झाले नाटकातील व्यथा,दाहकता प्रेक्षांपर्यंत पोहोचत होती ही दिग्दर्शकाची जमेची बाजू नाटक बघताना जाणवते.

Maharashtra State Drama Competition /Inflammation of workers' lives "Kalokh Deto Hunkar"

प्रकाश योजना रवी रहाणे यांनी केली माहागाईच्या कचाट्यात सापडलेला गरीब वर्ग शिक्षणा अभावी जीवनात पसरलेला अंधकार,अज्ञान,आंधश्रद्धा यांना बळी पडलेलेली गरीब,जनता मजुरी करणाऱ्या लोकांच्या वस्तीतील परिणाम कारक  वातावरण निर्मिती ते पेटलेली चुल स्ट्रीट लाईट चा लोंबणारा बल्ब अतिशय भेदक,तान असलेलं वातावरण निर्माण करत होते.

संगीत संयोजन भरत कुलकर्णी यांनी केलय नाटकाला, विषयाला साजेसे संगीत संयोजन होते. गीत गजानन चोपडे यांचे होते

नेपथ्य मंगेश चव्हण,यश चव्हाण यांनी केलय अतिशय विचारपूर्वक मंचावरच्या वापरलेल्या जागा स्ट्रीट लाईट चा खांब त्याचा  सिल्वर कलर झोपड्या समोरील जाणारा रस्ता परिणाम कारक होते.

रंगभूषा माणिक कानडे यांनी उत्तम केलीय.

शिरमी ही भूमिका अश्विनी सूर्यवंशी यांनी साकारलीय गरिबी,दारिद्र्यात पिचलेली बाई त्यांनी तिचे जगण्यातील बारकावे आपल्या अभिनयातून त्यांनी सादर केले.तानी ही भूमिका सीमा चोपडे यांनी अप्रतिम सादर केली समाजाच्या ज्या स्तरातून ही तानी येते ती अतिशय प्रभावी त्यांनी उभी केली.

नारबा ही भूमिका केलीय दिलीप काळे यांनी त्यांचे हालअपेष्टा,शोषण,गरिबी हाताशी नसणारे काम फार मनःपूर्वक त्यांनी आपल्या अभिनयातून दाखविले. भुत्या ची भूमिका करणारे किरण शिंपी बायकोच्या गरजे प्रसंगी लागणाऱ्या पैशासाठी नसबंदी करतो नंतर कीर्तन,भजन हेच आयुष्य उत्तम आपल्या अभिनयातून साकारत होते.मुकर्दम – सुनील गांगुर्डे यांनी साकारलामामु – भूषण गायकवाड जुम्मन चाचा – गजानन चोपडे

कलाकार 
अश्विनी सूर्यवंशी,सीमा चोपडे,किरण शिंपी,भूषण गायकवाड, सुनील गांगुर्डे,गजानन चोपडे,दिलीप काळे.
निर्मिती प्रमुख – सचिन चव्हाण

प्रवीण यशवंत
मोबाईल – 7767894435

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.