विजय नाट्य मंडळ नाशिक या संस्थेने सतीश कोठेकर लिखित “शरणम शांती” हे नाटक सादर केले. बुद्ध तत्वज्ञान व विहारातील गुरु,शिष्य यांच्या गोष्टीचे कथासूत्र
म्हणजे “शरणम शांती” हे नाटक.
शिष्या कडून नकळत काही अपराध घडतात दरम्यान उपचारासाठी आलेली तरुणी दोघेही एकाच विहारात असल्याने ते एकमेकांप्रती त्यांना आकर्षण आहे आणि ते दोघे आकर्षिलेही जाता गुरुजी तिला विहारातुन घरी पाठवता .. तो तरूण शिष्य ही निघून जातो पुढे दोघे एकत्र येता लग्न करता काही काळा नंतर ती विकार वासनेच्या आहारी जाते तो तिचा खून करतो पळतो आणि परत विहारात येतो पोलीस शोध घेत विहारात येता त्याला सजा होते इकडे गुरुजी महानिर्वाणाची तयारी करता दोन डायऱ्या विहारात शिष्यासाठी लिहून ठेवता त्यांना माहित असत तो परत येईल तेव्हा यातील लिखाण त्याला मार्गदर्शन करतील. तो येतो बुद्धाला शरण जातो साधक म्हणून उच्चकोटीचे स्थान प्राप्त करतो इथे नाटक संपते ही नाटकाची गोष्ट.
दिग्दर्शन वरूण भोईर यांनी केले नाटकातील फार छोट्या छोट्या जागा त्यांनी सूचक दाखविल्या ज्या उत्कृष्ट परिणाम साधत होत्या उदाहरण म्हणून शिष्य आणि तरुण मुलगी यांचं एकमेकांवरील आकर्षण त्यातून घडून आलेला शाररिक संबंधाच दृश्य दिग्दर्शकाने होडी मध्ये दाखवलं , होडी हे एकमेव साधन बुद्धविहारा पर्यंत यायचे.ही सूचकता फार परिणाम कारक होती.पहिला अंक विषयानुरूप सादरीकरणाच्या दृष्टीने संथ होता पण प्रेक्षकांची मन वेधणारा होती. काही प्रसंगात वाक्य नव्हती दृष्यात्मक गोष्ट होती ती प्रेक्षकाशी संवाद साधणारी होती उदाहरण म्हणून लहान शिष्य आणि जलचर प्राण्यांचा प्रसंग…
दिग्दर्शकाने मुख्य भिकु विहारातील गुरुजी ची भूमिका कारणाऱ्या पात्राचा आवाज त्याचा वेग डॉयलॉग चे प्रोजेक्शन यावर काम केले पाहिजे संपूर्ण नाटकाच्या अपेक्षित परिणामा साठी ते महत्वाचे वाटते. दुसरा अंक सुरु झाला त्याने नाटकाच्या आशयाचा, परिणामाचा उच्चबिंदू साधाला. दिग्दर्शक,नट तंत्रज्ञ यांचे विषयानुरूप उत्तम सादरीकरण !नाटकात बाळाला घेऊन येणारी महिला पाण्यातून चालत येते ? हा प्रवेश दिग्दर्शकाने पुढे प्रयोग असतील तर क्लियर करावे
प्रकाश योजना कृतार्थ कंसारा यांनी केली नाटकातील आशय विषय,दृष्य प्रकाश योजनाकारा शिवाय पोहोचवणे शक्यच नाही हे (ज्यांनी नाटक बघितले त्यांना लक्षात येईलच) अप्रतिम प्रकाश योजना होती. स्टेजवर होणारी संध्याकाळ, रात्र,सकाळ,विहाराच्या तलावाच्या पाण्यात फिरणारी बोट तलावाचा एरिया व पाणी.हे दिवसातील सर्व प्रहर,वेळ,काळ,स्थळ फार परिणाम कारक साधलंय प्रकाश योजनाकार कृतार्थ कंसारा यांनी.
साधारण स्टेजवरील नाटकातील पात्र त्याचे दृश्य याचे लाईट सोर्स जे असतात ते ठरलेले असतात जसे लेफ्ट,राईट विंग,टॉप,फुट,बॅक,वरील १,२,३, बार वरचे लाईट हे आपण बघतो. पण इथे प्रकाश योजनाकार या ठरलेल्या जागेची मेडतोड करतो प्रकाशाच्या येणाऱ्या दिशाच बदलून टाकतो आणि नाटकाचा आशय बोलू लागतो.
शिष्य साधनेच्या उच्च अवस्थेला पोहोचन उंचीच्या असलेल्या बुद्धाच्या चौथाऱ्यावर उभे राहण त्याच्या डोक्यावर टॉपनी लाईट येण पात्राचा बुद्ध posture येताच, तो लाईट जाणे, स्टेजवर अंधार होताच प्रेक्षकांच्या देशेने स्टेजवर लेफ्ट,राईट ठेवलेले फुट लाईट सुरु होने प्रेक्षकांचे डोळे मीचकणे आणि तुरंत लाईट बंद होणे हा प्रकाश योजनेचा उत्तम नमुना होता.नाटकाच्या उत्तम सादरीकरणात प्रकायोजनेच अतिशय महत्वाचे कॉन्ट्रीब्युशन आहे.
वरुण भोईर यांनी नाटकाचे नेपथ्य केले नाटकात बुद्ध विहारासाठी दाखवलेलं विहार स्थळ तलावातल्या मध्यभागी बोटीने यायचे व जायचे बोट हा एकमेव मार्ग हे विषयाला फार सूचक होत, इथे बुद्धाची शांती,विहारातील शांती,आजूबाजूचे तलावातील पाणी हे नाटकाच्या विषय,आशय जिवंत करत होते.चक्क रंगमंचावर फिरणारी बोट हे दृश्य अतिशय परिणाम कारकरित्या सादर होत होते त्याला महत्वाची जोड लाईट व संगीत होती.वरुण भोईर यांचं नेपथ्य नाटकातील विषयाला आशयाला जिवंत सादर होण्याचा भास निर्माण करत होते ही नाटकाची जमेची बाजू आहे.
संगीत संयोजन वरूण भोईर यांनी केले पहिल्या अंकातील बासरी दृश्यानुरूप परिणाम साधत होती. वेशभूषा सुरभी,संगीता यांनी केली जी विहारातील वातावरन निर्माण करणारी होती.
रंगभुषा सुरेश भोईर यांनी केली.
बाल शिष्य ची भूमिका रुद्र ओहोळ यांनी उत्तम साकारली, युवा शिष्य ज्ञानेश्वर कदम याने अतिशय गांभीर्याने समजून उमजून अभिनय केला,त्याची विहारातील मुली विषयीच आकर्षण,गुरूंचा धाक आणि आपला साधक म्हणून अभ्यास हे सगळं आपल्या अभिनयातून सुंदर साकारलंय.
प्रौढ शिष्य ही भूमिका महेंद्र चौधरी यांनी साकारली दुसरा अंकाचा स्पीड यात महेंद्र चौधरी अभिनय मोठा वाटा आहे.त्यांचा अभिनय,वाचिक,आंगिक,अभिनय परिणाम कारक होता. गुरुजी वयस्क शिष्य हा रोल अमोल थोरात यांनी केला यांनी वाचिक अभिनयावर मेहनत घेतली पाहिजे,आपली भूमिका,तिचा आवाज स्तर स्वच्छ वाक्य प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचते हे जाणून घेत आणि सुधारणा करण गरजेचे आहे.आपल नाटक सरू होता प्रथम आपलाच डॉयलॉग असेल आणि मोठी भूमिका असेल तर आपल्या आवाजाचा पिच,volume हे नाटकाच्या अपेक्षित परिणामाच्या दृष्टीने महत्वाचे असते.हे लक्षात घेतले पाहिजे.
यातील कलावंत धनश्री शेळके,पूजा (शब्दाली) वाघ,हेमंत गव्हाणे,महेश खैरणार,ऋषिका सातार्डेकर,सीरम सेठी,ओवी महाले. , रंगामाचं सहाय्य निलेश ओव्हाळ,विकेश ससाने,विलास गायकवाड, आनंत पांडे,कृष्णा रघुवंशी,
सहकार्य -श्रीराम विद्यालय,सायक्लोन डान्स अकॅडमी,राजा पाटेकर, आरती प्रभू हिरे,सागर सिरसाठ, नंदा रायते,ऍड अभिजित काळे,ऍड प्रेरणा देशपांडे.
प्रवीण यशवंत
मोबाइल – 7767894435
