६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धेत ३ डिसेंबर रोजी मनकामेश्वर मराठा मंडळ, नाशिक या संघातर्फे कर्म हे नाटक सादर करण्यात आले. कर्म हे नाटक कर्मावर आधारित आहे. आपण जसं करू तसं त्या कर्माचे फळ मिळतं. उद्दिष्ट आणि कर्म करताना एक अशी वेळ येते की ती प्रत्येक गोष्टीमध्ये येते. धनगर आपल्या लहान मुलाला पैसे मिळेल या हेतूने व्यापाऱ्याकडे काही काळासाठी पाठवतात. काही वर्षानंतर आपल्या मुलाला सोडवण्याचा मोह धनगराला येतो. त्याची बायको ही त्याला साथ देत नाही, अशा वेळेस तो वेगळ्या मार्गाला जातो आणि वेगळ्या मार्गाने तो धन कमवायला लागतो. अशा वेळेस व्यापाऱ्याला पैसे द्यावे लागणार यासाठी धनगर पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो.
अशाच एका दिवशी एक श्रीमंत व्यापारी त्यांच्या घरी येतो. त्यावेळेस धनगराला मोह येतो आणि तो त्या व्यापाऱ्याचा खून करून त्याच्या अंगावरील दागदागिने काढून घेतो. यातून मिळणाऱ्या पैशातून तो आपल्या मुलाला व्यापाऱ्याकडून सोडवणार असतो. परंतु त्याला कळते की आपण ज्या श्रीमंत व्यापाऱ्याला मारले तो आपलाच मुलगा आहे. आपण पाठवलेला आपला लहान मुलगा पुढे धनवान होऊन आपल्याकडे आला व आपण त्याचाच खून केला. पैशासाठी स्वतःच्या मुलाचा सुद्धा तो खून करून टाकतो. पर्याय नसल्यामुळे तो पत्नीचाही खून करतो आणि शेवटी प्रायश्चित्त म्हणून तो स्वतःचे जीवन संपवून टाकतो. म्हणजे शेवटी पैसा, वृत्ती, घर हे सगळे इथेच राहतं. पण कर्माने जे काही मिळतं, ते कर्माने घ्यायचं सोडून कर्माच्या विरुद्ध जायला लागतो. कर्माची परिस्थिती या कर्म नाटकात दाखवलेली आहे.
कर्म या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शन विजय मराठे यांचे होते. नेपथ्य महेंद पाटील तर संगीत राकेश भंडारी यांचे होते. प्रकाश योजना विनोद राठोड यांची तर रंगभूषा /वेशभुषा माणिक कानडे यांची होते. नाटकात प्रिया सुरते – गोदावरी, विजय मराठे – दशरथ, राजेंद्र चिंतावार – व्यापारी, रचना चिंतावार – व्यापाऱ्याची पत्नी, महेंद्र पाटील – तरासिंग, देवांश हिरे – राम, ओवी नाठे – जानकी, भाऊराव झोले -नारायण, मिलिंद चिखलीकर -शिरप्या बाबा, संकेत शिंदे -गोपाल, प्राजक्ता देशमुख -माया, कल्पेश भालेराव -सावकार यांनी भुमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
विशेष सूचना
दिनांक ४ डिसेंबर रोजी प.सा.नाट्यगृह येथे कुठलाही नाटकाचा प्रयोग सादर होणार नाही.
दिनांक ४ डिसेंबर च्या “फुली ” ह्या नाटकाचा प्रयोग दिनांक ७ डिसेंबर ला सादर होईल.
संस्था – मानवता बहुद्देशीय विकास
तसेच धुळ्यातील लोकमंगल कलाविष्कार ह्या संस्थेचा “लॉटरी” ह्या नाटकाचा प्रयोग सादर होणार नाही.गुरुवार दि,५ डिसेंबर सायंकाळी ७ वाजता
नाटक- वो फिर नाहीं आते ..
लेखक अतुल गायकवाड
दिगदर्शक-हेमंत गवळे
संस्था- मधुरा बहुद्देशीय विकास संस्था,नाशिक