व्यावसायिक छाप असणाऱ्या हौशी नाटकाचा दमदार प्रयोग.”खेळ मांडियेला”

६२ वी हौशी मराठी राज्य नाट्य  स्पर्धा नाशिक-प्रवीण यशवंत

0

संकर्षण युवा फाउंडेशन नाशिक यांनी सादर केलेले “खेळ मांडीयेला” हे नाटक स्पर्धेत सादर केले.नाटकाचा विषय इनामदार आणि मंगल इनामदार या वृद्ध दांपत्याची गोष्ट सांगते.जन्माला येताना माणूस जसा एकटा येतो तसा मृत्यू नंतर एकटाच जातो पण या दोन्हींमधल्या प्रवासातले आयुष्य जगताना त्यांना वयाच्या एका टप्प्यावर त्याचे एकटेपण सोसवत नाही ,ते एकटे पण घालवण्यासाठी माणूस धडपडत असतो आणि ते कोणाला जाणवू नये यासाठीही त्याचा प्रयत्न आणि धडपड सुरूच असते.विषयाचा हाच धागा धरून नाटक शेवटापर्यंत जाते आणि एक अत्यंत संवेदनशील अशी या दांपत्याची उतार वयातली गोष्ट प्रेक्षकांच्या समोर येते.

या वृद्ध जोडप्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये असतो तो तिथं परस्पर आई-वडिलांना न विचारता, न  सांगता विवाह करतो  या सगळ्यांचा प्रचंड धक्का या वृद्धं जोडप्यावर पडतो.दरम्यान त्यांनी वृत्तपत्रामध्ये आपला वाडा विकायचा आहे अशी एक जाहिरात दिलेली असते आणि त्यानिमित्ताने वाडा विकत घेण्यासाठी जे कोणी लोक येतात त्या लोकांबरोबर बोलणं चालणं त्या वाड्याविषयी माहिती देणे  या सगळ्या आपल्या कृतीतून ते आपला एकटेपणाच घालवण्याचा प्रयत्न करतात.हा वाडा शहरापासून किमान पाच-सात किलोमीटर दूर आहे. आजूबाजूला कोणी नसत न घरामध्ये न घराच्या आसपास त्यात हे वृद्ध दांपत्य आणि आयुष्यात आलेला एकटेपणा, मुलगा अमेरिकेत या सगळ्या घटना,प्रसंग नाटकातून अतिशय मनोरंजनात्मक हसत,हसत प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाता.लेखक विशाल कदम यांनी नाटक सुटसुटीत लिहलंय तेव्हढेच ते नाटकातील कलावंताना अवघड वाटण्याची शक्यता आहे कारण हे  दिग्दर्शकीय नाटक आहे.अशा नाटकात उत्तम कलाकार नसतील तर लेखकाचे नाटक, प्रयोग फसण्याची शक्यता असते..

Maharashtra State Drama Competition /"Khel Mandiyela" is a powerful experiment of amateur drama with a professional impression.

विशाल कदम हे अतिशय उत्तम लेखक आहे अगदी हसत हसत आपल्या नाटकातनं सामाजिक भान देऊन  प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ही त्यांची लेखन खासियत आहे.(लेखक विशाल कदम आणी दिग्दर्शक विक्रम पाटील यांची नाशिक मध्ये दहा वर्षांपूर्वी ४० स्पर्धक असलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये त्यांची  “सेकंड हॅन्ड ”  ही एकांकिका सर्व प्रथम पारितोषिकांसंहित प्रथम  होती.त्यांची नाटकाचे लेखक म्हणून नाटकाची मांडणी आणि प्रेक्षकांची बांधणी याचे उत्तम भान असणाऱ्या लेखक विशाल कदम, दिग्दर्शक  विक्रम पाटील यांनी व त्यांच्या टीमने “खेळ मांडियेला” नाटकाचे दमदार सादरीकरण केले.

या नाटकाचे दिग्दर्शन विक्रम पाटील यांचे होते प्रत्येक दुष्य सफाईदार कलावंताचे तंत्रा बरोबरचे टाइमिंग.दृश्य सुरु होणे आणी संपणे याची योग्य वेळ व टाइमिंग उत्तम प्रेक्षकांना बांधून ठेवत होते योग्य तो परिणाम साधत होते ही दिग्दर्शकाची पकड नाटक व प्रेक्षकांप्रती जाणवत होती.

प्रकाश योजना शाम चव्हाण यांची होती,विषय आशयला अनुरूप,सुव्यवस्थित प्रकाश नियोजन रंगमंचावरील लाईटचे डिझाईन आशयानुरूप आणि दृश्यात्मक होते, ओपनींग आणि  क्लोजिंग लाईट, योग्य तो वेग,परिणाम साधत होते. नाटकाच्या परमोच्च बिंदुवर अपेक्षित यशस्वी परिणाम साधला गेला तिथे नाटक संपते.शाम चव्हाण यांची प्रभावी परिणाम कारक प्रकाश योजना नाटकाची जमेची बाजू होती.

थोडक्यात नाटकाचे विषयाचा जो अपेक्षित क्लायमॅक्स साधला गेला त्यात प्रकाश योजनेचा फार मोठा वाटा होता.
नेपथ्य गणेश सोनवणे यांनी सूचक मांडलय रंग मंचावरील दिसणारा प्रशस्त वाडा वापरलेले मोजक सामान वस्तू आडगळीच्या सामानासाठीची वापरलेली जागा त्याची उंची त्या जागेचा वापर अप्रतिम होता उत्तम नेपथ्य.

Maharashtra State Drama Competition /"Khel Mandiyela" is a powerful experiment of amateur drama with a professional impression.

संगीत निनाद म्हैसाळकर यांचे होते .संगीत संयोजन तेजस बिल्दीकर यांनी केले.वेशभूषा चिन्मय स्वामी यांची उत्तम होती.रंगभूषा माणिक कानडे यांची होती.

म्हातारी या नाटकातील मुख्य पात्राची भूमिका केलीय अपर्णा क्षेमकल्याणी यांनी त्यांनी केलेली म्हातारी तिची डॉयलॉग डिलिव्हरी,बॉडी लेंग्वेज,म्हातारीच्याआत वाटणारे एकटेपण लपवत होती  प्रेक्षकांनाही ते पटत होत अपर्णा क्षेमकल्याणी  यांनी उत्तम भूमिका केली त्या उत्तम अभिनयाच सादरीकरण करत होत्या.

म्हातारा ही भूमिका प्रमोद पूजारी यांनी केलीय आपण मंचावर कसे दिसू प्रेक्षक आपल्याला, म्हाताऱ्याला कसे ऐकतील,यांचं प्रचंड भान प्रमोद पूजारी यांना असावं त्यांनी  केलेला उत्तम म्हातारा बघताना जाणवते.अप्रतिम काम केलय  प्रमोद पुजारी,अपर्णा क्षेमकल्याणी यांनी.

जाधव या इस्टेट एजंटची भूमिका केलीय नाटकाचे दिग्दर्शक विक्रम पाटील यांनी ते स्वता दिग्दर्शक असल्याने नेमकं काय करायचंय ते त्यांना माहित असल्याने फार छोट्या,छोटया जागा अभिनेता म्हणून त्यांनी उत्तम परिणाम कारकपणे वापरल्या अतिशय तयारीचा  सराईत अभिनेता विक्रम पाटील याची भूमिका नाटकाची जमेची बाजू होती.गिऱ्हाईक ही भूमिका गणेश सोनवणे यांनी विषयानुरूप साकारलीय.

लेखक – विशाल कदम
दिग्दर्शक – विक्रम पाटील
प्रकाश –   शाम चव्हाण
नेपथ्य –  गणेश सोनवणे
संगीत – निनाद म्हैसाळकर
संगीत संयोजन – तेजस बिल्दीकर
वेशभूषा  चिन्मय स्वामी
रंगभूषा माणिक कानडे 

कलाकार 
अपर्णा क्षेमकल्यानी,प्रमोद पूजारी,विक्रम पाटील,गणेश सोनवणे.
विशेष आभार –
सार्वजनिक वाचनालाय मखमला बाद,श्रीपाद सोनार,रोहित देशमुख,विठ्ठल कटके,प्रसाद ओझरकर,हरिभाऊ जाधव,केतकी कुलकर्णी,कृष्णा मरकट,माधुरी मोरे,शाम पवार,अवधूत पुरोहित.

प्रवीण यशवंत
मोबाईल – 7767894435

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!