बदलत्या नात्यांचा शोध “कूस बदलताना”

६२ वी हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा.नाशिक- प्रवीण यशवंत 

0

“कूस बदलतांना” यां नाटकाच्या पहिल्या अंकात विश्वास आणि ईशा यांची लिव्ह इन रिलेशनशिप वर नाटक बोलत, पारंपारीक एक बायको तिचे विचार कुटुंबं नंतर तिच आई होणं या गोष्टी हव्या कशाला फक्त ती एक स्त्री आहे म्हणून तर या गोष्टीला तिचा विरोध म्हणू किंवा एक वेगळा विचार जो आपल्या समाज रचनेत न पटणारा. पुढे विश्वास ईशात गुंततो तिच्याशी लग्न करून संसार करावा अस त्याला मनोमम वाटते आणि तो ईशा समोर व्यक्तही होतो. ईशा त्याच्या प्रपोजला नकार देते प्रामुख्याने तिला मूल नको असत आणी लिव्ह इन मध्ये येण्याअगोदर तीने विश्वास ला सर्व क्लेयर केल असत आणि आता तिचा ब्रेकअप चा निर्णय फायनल असतो.

ती रात्र तिच्या साठी आणि त्याच्या साठी शेवटची असते ती रागात  असते,त्रागा करत असते विश्वास तिला म्हणतो ज्या विचाराणे आणी सामंजस्याने आपण एकत्र आलो तसाच संवाद या क्षणाला असू दे तुझ्या डिसिजन प्रमाणे उद्या आपण दोघेही वेगळे असू , ती हसून म्हणते आजची रात्र आपण सेलिब्रेट करू म्हणून इशा हसतच बेडरूम जाते आणी त्यालाही बोलावते पण तो ईशाच्या प्रेमात पडलाय तिच्याशी फक्त शाररिक संबध आता त्याला नको होते तो तसाच काही क्षण उभा आणी बेडरूम मध्ये जातो.पहिल्या अंकातली ही गोष्ट.

अंक दुसरा पत्रकार असलेली नॅन्सी आणी सेली हे दोघंही लिव्ह इन मधले आणी यांचं ही ब्रेकअप होत कारण नॅन्सी ख्रिश्चन् आणी सेली मुस्लिम हा यांचा प्रॉब्लेम नाही तर सलीम आई म्हणते नॅन्सी ने लग्ना नंतर धर्म बदलावा सलीम म्हणतो तेसिरीयस नको घेऊ यावर त्यांच डिबेट आणी वाद आणी ब्रेकअप हे दोन अंकातील दोन प्रसंग लिव्ह इन नंतर ब्रेकअप कारण वेगळी. (एहिक सुखासाठीची दंगलच ही )

हे दोनही प्रसंग पहिल्या, दुसऱ्या अंकातले वेगळे असले तरी त्याची लिंक कनेक्शन आणी दोन्ही प्रसंगातील विश्वास,ईशा आणी नॅन्सी,सेली हे नाटकात एकमेकांशी रिलेटेड आहे.स्त्री,पुरुष संबध हा आपल्या समाजात कायम आकर्षित करणारा विषय आहे ‘जो कूस बदलताना’ नाटकात अतिशय परिणाम कारक आपल्या समोर येतो.लिव्ह इन मधील स्त्री पुरुष यांच्यातील विचार,नात,त्यांच्या कृती,नसणारे आणी असणारे ताण थोडक्यात लिव्ह इन ही गोष्ट  तपासन शोधन आणी समजून घेणं हे नाटक आहे.

बदलत्या आजच्या काळानुसार माणसाची जगण्याची पद्धत बदलतीय लिव्ह इन हा त्याचाच भाग लिव्ह इन मधील स्वातंत्र्य जरी असलं तरी पिढ्यानपिढ्यामनात घट्ट असलेल्या सणातन पारंपारीक रूढी या डोकावनारच त्यामुळे नात्यातला गुंता आजही  नाटकातून समोर येतो  सेली,नॅन्सी च्या नात्यातून आणी विश्वास, इशाच्या नात्याच्या निमित्ताने. हे नाटक एक वेगळा अनुभव देऊन जाते.अप्रतिम नाटक लिहलंय नाटककार भगवान हिरे यांनी ‘कूस बदलतांना’

विश्वास ची भूमिका केलीय रितेश गायकवाड यांनी रंगमंचावर त्यांचे व्यक्तिमत्व आणी अत्यंत प्रभावी आणी त्याच्या भूमिकेला फिट्ट होत,आपल्या लिव्ह इन ‘इशा’ विषयी त्यांची ओढ त्यांच्या अभिनयतून उत्तम साकारली,पूर्ण नाटकभर त्यांच वावरण ऍक्शन रिऍक्शन समजून घेणं आणि नाटकाच्या आशयानुरूप काम करण्याचे एफर्ड घेणे हे त्यांच काम करताना जाणवत होते.

इशा ची भूमिका केलीय सुमन शर्मा यांनी अतिशय उत्तम अभिनय केलाय ईशातला attitude आयुष्या विषयी तिचे असलेले विचार हे तीने अभिनयातून उत्तम दाखवले.
गिरीजा ही कामवाली बाई आहे नाटकात तिचा रोल ही सुमन शर्मा यांनीचा केलाय कामावाली बाई त्यांनी अप्रतिम उभी केलीय,या दोनही भूमिका त्यांनी इतक्या लिलया पार पाडल्या यातून त्यांची अभिनयाची उत्तम जाण आहे हे लक्षात येत.

Maharashtra State Drama Competition Marathi DramaAn exploration of changing relationships Kus Badalatana

नॅन्सी या पत्रकाराची भूमिका केलीय रंजना चौधरी यांनी अतिशय विचार पूर्वक सादर केलीय स्त्री पत्रकार म्हणून असलेला बाणा आणि स्त्री म्हणून त्यांचे जाणण्याचे विचार अप्रतिम असे त्यांनी रंगमचावर सादर केले.

सेली यांची भूमिका केलीय भारत मधाले यांनी त्यांची डॉयलॉग डिलिव्हारी बॉडी लंग्वेज आणि सुरु असलेलं त्यांच दृश्य याची त्यांना उत्तम जाण होती उत्तम performance भारत मधाळे यांचा. गिरीजा यांचा नवऱ्याची भूमिका केलीय शंकर वाघमारे यांनी सुंदर काम केलंय ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

दिग्दर्शन – दिग्दर्शक चारुदत्त हिरे यांनी केलंय कथानकातून काय सांगायचे यांच उत्तम भाण त्यांना होत त्यातून नाटक प्रभावी सादर झाल.नेपथ्य – विराज घोरन यांनी नेपथ्य केलंय जे अप्रतिम होत विश्वास च घर त्यातील सामानाची मांडणी,नॅन्सी च ऑफिस तिथले डिटेलिंग, कथानकाल साजेसे असे नेपथ्य होत विराज घोरन यांचं.

प्रकाश योजना – संदेश सावंत,कृतार्थ कंसारा यांनी कथानकाला साजेसी उत्तम अशी प्रकाश योजना कृतार्थ आणी संदेश यांनी केली.
संगीत संयोजन – विकास शिंदे यांनी केल कथानकाला साजेस अस संगीत होत.
वेषभूषा – लीना सोनार,राखी लढा यांनी अत्यंत विचार पूर्वक अशी होती.
रंगभूषा – माणिक कानडे यांची होती.

या सर्व कलाकारांनी प्रभावी अप्रतिम सादरीकरण केलं.
कलावंत – रितेश गायकवाड,भारत मधाळे मधाळे,रंजना चौधरी,शंकर वाघमारे,सुमन शर्मा.
लेखक -भगवान हिरे,
दिग्दर्शक- चारुदत्त हिरे
निर्मिती प्रमुख – दीपक टावरे
सूत्रधार योगेश बागुल,कुणाल खरे
सह निर्मिती – जयंत भांभारे ,जीवन चौधरी,सुदर्शन भालेरावं.
सहाय्य – करावं कर्वे, शैलेश आर,राम यादव
नेपथ्य – विजय धोरण,दिनानाथ प्रतापजी.
प्रकाश योजना – संदेश सावंत,कृतार्थ कंसारा
संगीत संयोजन – विकास यांनी,तेजस बिल्डीकर
वेशभूषा – लीना सावंत,राखी लढा
रंगभूषा – माणिक कानडे
रंगमंच व्यवस्था – पराग अमृतकर,रवींद्र शिंदे,मिलिंद मेधने, प्रवीण मोकाशी,दीपक ढोली,अशोक सोनावणे, तुशार जाधव,महेश बोरसे,प्रशांत हजारे.

प्रवीण यशवंत 
मोबाईल – ७७६७८९४३५

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!