सुरभी थियेटर नाशिक या संस्थेने ‘दानव’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर केले.विवाहबाह्य संबंधावर नाटक बोलते.ऐका विवाहित दांपत्याच्या आयुष्यात एक सायकॅट्रिक प्रवेश होतो. शनाया च्या ट्रीटमेंट निमित्ताने दोघांची चागली ओळख होते. शनाया च एकंदरीत बॅग्राउंड बघून तिची प्रॉपर्टी,नवरा बायकोचे नाते, बघून सायकॅट्रिक सार्थक ओळख वाढवितो दोघांनामध्ये चांगले नाते तयार होते, डॉ सार्थक तिला ऑपरेट करून तिच्या नवऱ्याचा खून तिच्या हातून घडवितो पुढे डॉ ‘सार्थक व शनाया लग्न करता’
शनाया च्या लक्ष्यात येऊ लागते, हा, डॉ सार्थक ट्रीटमेंट व नात्याच्या निमित्तने काही हेतु साध्य करतोय,डॉ सार्थकलाही शनायाचा डाऊट येऊ लागतो शनायाने आपलं पितळ उघडे पाडले तर ? तो प्रतिष्ठित असल्याने त्याला हे सगळं नको असते.गावी जायचे म्हणून तो शनायाला घेऊन जातो एक नीरजन ठिकाणी असलेल्या खंडर मधे दोघे येता. दोघेही एकत्र असता,बोलता,पण आतून दोघेही एकमेकांवर डाऊट घेताय, एकमेकांची भीती व सावधानता बाळगून आहे. पाशा नावाचा सुपारी किलर डॉ सार्थक यांच्या संपर्कात आहे.इथे एक नाट्य घडून येते,पुढे त्या खंडर मधे येणारे सर्व पात्र हे पोलीस असता हे शेवटी कळत आणि सुपारी किलर पाशा हा पोलिसच असतो शनाया च्या नवऱ्याच्या मर्डरची इन्व्हेस्टिकेशन अंती केलेला हा प्लान असतो, डॉ सार्थक व शनाया यांना अटक होते इथे नाटक संपते…मर्डर मिस्ट्री,सस्पेन्स नाटक “दानव”
इथे लेखक अतुल साळवे डॉ सार्थक व शनाया यांच्या माध्यमातून मानवी वासना,आकर्षण,दाभिकता,लैंगिकता,हिंसा ,विवाहबाह्य संबंधातून घडणाऱ्या घटना,प्रसंग त्याचे अंतिम परिणाम “दानव” नाटकातून सांगता.
मानवी सर्व भावनांचे प्रदर्शन त्यांनी मध्यवर्ती मांडलेला विवाहबाह्य प्रसंगाच्या माध्यमातुन नाटक पुढे नेता, ते फिल्मी वाटत. ते आपण वेब सिरीज,सिरीयल,क्राईम सिरीयल,सिनेमे इथ बघतोच की…इथे कल्पिलेला विवाहबाह्य प्रसंग या नात्या अतिरिक्त .अनेक मानवी नात्यांच्या गुंतागुंतीतून अपेक्षित प्रसंग,घटना मांडून नाटक लिहता आले असते. आपल्या रोजच्या जगण्यात किती तरी दानव आपण बघतो,बापाचा मुलीवर बलात्कार,भावाचा अगदी लहान बहिणीवर बलात्कार,हे आजचे महत्वाचे महत्वाचे विषय मला वाटता… दानव ही प्रवृत्ती आपल्या सर्वांन मध्ये आहेच….
शेवटी प्रत्येक लेखकाला आपल वाटण,मांडण,हे स्वातंत्र आहेच…कुठल्या माध्यामुन काय मांडायचे याचे भान महत्वाचे वाटते…
दिग्दर्शन राजेश शर्मा यांनी केले आहे विषयानुरूप त्यांनी दिग्दर्शन केले आहे पात्रांची मांडणी त्याची प्रेक्षकांना अप्रतिम दिसणारी फ्रेम,नेपथ्य मांडणी याचे उत्तम व्यवस्था त्यांनी रंगमंचावर दिग्दर्शक म्हणून लावून घेतलीय. नाटकाचा विषय प्रभावी मांडण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शक राजेश शर्मा यांनी केलाय.
भैरव ही भूमिका भगवान निकम यांनी केलीय संपूर्ण नाटकात भैरवनी आपला दबदबा आणि परिणाम उत्तम निर्माण केला त्यांच्या अभिनयातुन त्यांनी शेवटपर्यंत शाबूत ठेवलेलं नाटकाच सस्पेन्स ! अप्रतिम होते ! ही नाटकाची जमेची बाजू होती.
अथर्व ची भूमिका संदीप कोते यांनी साकारलीय ते सायकॅट्रिक वाटत नव्हते, पुढचा प्रयोग असेल तर हा विचारा करावा,बाकी त्यांनी सफाईदार काम केले.शनाया भूमिका तृप्ती देव यांनी साकरली रोल मोठा होता तो त्यांनी वर्कआउट करण गरजेचं.
चांडाळी ही भूमिका नयना सानांसे यांनी केली डॉयलॉग फार आक्रमक बोलत होत्या याचा विचार करावा स्टेजवरचे त्यांच वावरण सहज व प्रभावी होत.संगीत संयोजन नंदू परदेशी यांनी केले ते नाटकातील थ्रिलींग, सस्पेन्स,अप्रतिम निर्माण करत होते. संगीत संयोजन विषयानुरूप होते परिणाम कारक होते.
प्रकाश योजना विनोद राठोड यांनी लेलीय विषयानुरूप प्रकाश योजना होती.नाटकातील काही दृश्य वातावरण निर्माण केलेल्या ठिकाणी हॉरर फिल्मच फिलींग होते.काही ठिकाणी उत्तम सस्पेन्स वातावरण निर्मिती केली प्रकाश योजनेने.
नेपथ्य शैलेंद्र गॅौतम यांनी केले विषयानुरूप नेपथ्य होते खंडर साठी वापरलेले फ्लेक्स खटकट होते,तरीही नेपथ्य विषय दृष्ट्या परिणाम साधत होते.वेशभूषा सई मोने पाटील यांनी केली. रंगभूषा माणिक कानडे यांनी केली.रंगमंच व्यवस्था शुभम शर्मा,ललित बत्तासे,प्रवीण झोपे.प्रसिद्धी -राजा पाटेकर यांनी सांभाळली.श्रीकांत बेणी यांचे सहकार्य लाभले .
कलावंत – नयना सनासे, सृष्टी देव,तानाजी दुघदे,भगवान निकम,संदीप कोते,यांनी विषयानुरूप आपल्या भूमिका साकारल्या.
प्रवीण यशवंत
मोबाईल – 7767894435
