जाचक रुढी परंपरेवर भाष्य करणारे नाटक “संगीत अवघडीचे पाच दिवस”
६२ वी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नाशिक -प्रवीण यशवंत
लेखक ओंकार टिळे यांनी लिहलेल्या आणी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात समाजातील परांपरा रूढी त्यातील पराकोटीची अंधश्रद्धा आणी त्यातून जगण्यात निर्माण झालेला ताण आणी हिंसा असा विषय पहिल्या अंकात सादर झालेल्या काही दृश्यातून समोर येतो आणी अंक संपतो जो साधारण सव्वा ते दीड तास सुरु होता.
दिग्दर्शकाने नाटकाच्या तांत्रिक बाजूची बांधनी खूपच उत्तम केली होती नेपथ्य,संगीत,लाईट,वेशभूषा,रंगभूषा या इतक्या भारावून टाकणाऱ्या होत्या की हौशी नाट्य प्रेक्षकांना दिग्दर्शक या नात्याने खिळवून ठेवल होत खूपच भारावलेले प्रेक्षक आणी त्यांचा प्रचंड असा प्रेक्षकांचा प्रतिसाद होता.
“पण संगीत अवघडीचे पाच दिवस” या नाटकाच्या नावाच्या अर्थाने पहिल्या अंकात लिंक दिसली नाही लेखकाची आणी दिग्दर्शकाची.त्याच कारण एकाच नाटकात दोन वेगळे विषय होते आपल्या घरातले रूढी परांपरा सोवळे ओवळे जवळून पाहणारा दीप राजमाने याला लहानपणापासूनच आरश्या समोर मुलींचे नटणे मुलींची वेशभूषा करणे तसे राहणे आवडायचे आणी याच रागातून वडील त्याला लहानपणीच घरातून हाकलून देतात आणी पुढे हाच दीप राजमाने अप्पा जोगतीन म्हणून प्रसिद्धिस येतो आप्पा जोगतीन पुठे हा आपला परिवार मोठ्या प्रमाणात वाढवतो आणी जोगतिनेच्या या प्रवासाच्या माध्यमातूनं समाज प्रबोधन करतो. पहिल्या अंकाचा हा विषय अतिशय प्रभावी आणी उत्तम सादर केलाय.
दुसरा अंक – चिरिपल्ली गावातील गोपाळरवं
पाटील आणी तुळसा पाटील कुटुंबं गावातील वाड्यावर जोगतिनिला उत्सवासाठी आमंत्रित करते.देवीच्या या सोहळ्यात पाटलांची सुन देवीची आरती करताना तिला पिरियड येतात किंवा विटाळ येतो आणी विटाळात तिला या सोहळ्यातून बाजूला काढून तुछतेची वागणूक पाटील बाई देते सुन शिकलेली असूनही आदर म्हणून हा सर्वान समोर झालेला अपमान सहन करते विटाळात बाजूला बसताना आपल्या तान्ह्या बाळाला दूध पाजण्यासाठी सुद्धा सासू बाळाला तिच्या जवळ देत नाही शिवपालव होईल म्हणून.याच प्रसंगी पाटलीन बाईचा मुलगा परदेशातून येतो आणी आपल्या बायकोला विटाळात दिलेली वागणूक कशी चुक आहे हे आपल्या आईला सांगण्याचा प्रयत्न करतो पण पाटलीन बाईची समज, रूढी परांपरा आणी शब्द हा अंतिम असतो ही भूमिका बघून अप्पा जोगतीन पाटलीन बाईचे समस्त जोगतीन समवेत त्यांची अंधश्रद्धा त्यांना समजून सागण्याचा प्रयत्न करता प्रबोधन करता आप्पा जोगतीन कामाख्या देवीचे योनीतून आलेलं रक्त लोक तीर्थ म्हणून पिता मग तिथ विटाळ का नाही ? इथे आप्पा जोगतीन विटाळाचे पाच दिवस बाजूला बसन कस चुकीचं आहे याच खर शास्त्रच पाटलीन बाईला रियलाईज करून देते आणी पाटलीन बाईच्या आतली आई जागरूक होते हे सगळं राचित थोतांड आहे याची विचार पूर्वक जणीव होते… लेखकाने घेतलेली ही भूमिका स्तुत्य आहे.जोगतिनेचा प्रवास,विटाळात बाजूला बसलेल्या बाईचा प्रवास तिची अवस्था नाटकात दाखवली नाही तर यावर लेखकाने घेतलेली भूमिका आहे.
लेखक – लेखकान लिहलेलं नाटक बघताना त्या दोन वेग वेगळ्या एकांकिका वाटतात राज्य नाट्य स्पर्धे साठी केलेलं manufacturing वाटत.नाटक खूप छान लिहलंय पण तुकड्यात समजून घेताना पहिल्या अंकातील जोगतिनीची गोष्ट दुसऱ्या अंकातील विटाळात पाच दिवस बाजूला बसलेल्या बाईशी लिंक नव्हती कथानकाची नायकीन विटाळातील सुन असलेलं पात्र म्हणजेच नाटक “संगीत अवघडीचे पाच दिवस” हे पहिल्या अंकात कुठे होते.(आता सरळ नाटक बघितल्यावर साऊथ ची वाटते वाटते)
दिग्दर्शक ओंकार टिळेच सुंदर दिग्दर्शन आपल्या लहान मुलाला घरातून काढून दिल्यावर घरातून फक्त आरसा घेऊन जातो जो पुढे जोगतीन म्हणून ओळखला जातो अतिशय प्रभावी सूचकता होती दिग्दर्शकाची असे अनेक दृश्य जे सांगता येतील . दिग्दर्शक जेव्हा रंगमचाची चौकट ब्रेक करून प्रेक्षकांच्या जागेत येऊन मंचीय सवांद साधातो उसाचा शेताचे दृश्यच प्रेक्षकांमधेच रियलास्टक पद्धतीने उभे करतो हे अप्रतिम होते या सगळ्या केलेल्या प्रयोगा मुळे अक्षरशः प्रेक्षकच नाटकातील पात्र म्हणून काम करत होते अस फिलींग असण्याची खूप शक्यता होती.
प्रकाश योजना – उत्तम प्रकाश योजना आणी त्याचा वापर नाटकातील प्रसंगातील मूड जेव्हा प्रकाश योजनाकार साधतो तेव्हा तो नाटककाराचा आशय मोठ्या प्रमाणात जिवंत करत असतो आणी अनेक प्रेक्षकांच्या मनात त्या दृश्य प्रतिमा छापीत असतो.नाट्यगृहातील बाल्कनी मध्ये वरती मधोमद लावलेला स्पॉट लाईट अप्रतिम नाटकातील प्रसंगारूप वेळोवेळी योग्य तो परिणाम साधत होता.देवीच्या आरत्यांचे दिवे,ताटभर ठेवलेल्या जळत्या पणत्या फुक मारल्यावर विझणारे दिवे हे सगळे इलेक्ट्रॉनिक होते खूप छान. भरपूर प्रसंग सांगता येतील शेवटी सुंदर प्रकाश योजना होती नाटकातील जमेची बाजू.
संगीत संयोजन सुरुवातीला खूप कर्कश साऊड होता पण वाजणारे पीसेस प्रभावी होते नंतर शेवट पर्यंत त्यांनी उत्तम परिणाम साधाला की सुरुवातीचा कर्कशपणा प्रेक्षक विसरून गेले इतके सुंदर संगीत संयोजन होते.
दुसरे नाटकात वापरलेले संगीत हे लाईव्ह होते आणी प्रेक्षकात कनेक्ट करत होते.तिसरे नाटकात कैलास शिरसाठ नावाच्या कलावंताने नाटकासाठी लिहलेली गाणी जी नाटकासाठी फार महत्वाचा परिणाम साधत होती आणी ती विंगेतून गाणारी मंडळी ही नाटकातील स्त्री कलावंत होते सुंदर आवाज आणी कोरस.अशा या तीनही पद्धती संगीत संयोजकाने वापरल्या होत्या यावरून सर्वच टीमने प्रचंड कष्ट घेतलेय हे जाणवते.नाटकासाठी दुसरी जमेची बाजू.
नेपथ्य – या नेपथ्यकाराणे रंगमंचा सहित पूर्ण प्रेक्षगाराचा नेपथ्य साठी उपयोग केला प्रेक्षकातील सुरुवातीच्या तीन रांगामध्ये उसाच्या शेताचे दृश्य उभे केले.दीप राजमानेच्या घराचा सेट ते चिरिपल्ली गावातील देवी असलेल्या वाड्याचा सेट सर्व खूप योग्य होत.
वेषाभूषा नाटकातील खूप जमेची बाजू आणी विचार पूर्वक होती प्रभावी दृश्य साधण्या साठी एखाद्या घडणाऱ्या प्रसंगाला उभारी देण प्रेक्षक म्हणून एक सुंदर दृश्य अनुभवण होत.नाटकातील गोष्ट सांगण न हरवता.
रंगाभूषा ही या नाटकातील तेव्हढीच महत्वाची बाजू आहे आणी ती उत्तम होती.
कलावंत – दीप राजमाने जो पुढे आप्पा जोगतीन म्हणून समोर यतो ती भूमिका केलीय प्रबुद्ध मागाडे ने सुरुवातीचा अंक आणी क्लायमॅक्स मध्ये अप्रतिम अभिनय केलाय नाटकाच्या शेवटी ज्या उंचीला जाऊन परिणाम साधने अपेक्षित असते ते काम प्रबुद्ध ने नाटकात केलेय सुंदर भूमिका.
मोहिनी भगरे यांनी तुळसा पाटीलीन बाईची भूमिका साकारलीये, प्रेमळ, वेळप्रसंगी कठोर धार्मिक सामाजिक रितिरिवाज घट्ट माननारी पाटलीन आणी प्रसंगी आई म्हणून रितिरिवाज परांपरा यांना धुडकवणारी पाटलीन बाईची भूमिका प्रभावी पणे सादर केलीय.
मोहिनी भगरे,सौरभ पगारे,दर्शना वैद्य, ईश्वर्या धोटे,इंद्रायानी गागुर्डे प्रतीक्षा ठाकूर,आयुष जाचक,राज कुंदन,सारीका शिंदे,प्रसाद चव्हाण,कैलास शिरसाट,वैभव काळे,श्रेयस हिरे,दिक्षा पवार ,आकांशा देशमाने,मैथेली सोनवणे,सत्यकी देशमाने,मधुर तरटे,स्वरूप पीसे,श्रावणी गिरोल्ला,स्नेहा केदार,रोहन पाटील,अनुराग कडेकर,प्रभुद्ध मागाडे,आणी ओंकार टिळे.या सर्व कलावंतांनी अप्रतिम खूप छान काम केलाय खूपच छान… ‘संगीत अवघडीचे पाच दिवस’
प्रवीण यशवंत
7767894435
