Nashik:२० नोव्हेंबर पासून रंगणार कलावंताचा “नाट्यसंग्राम”
६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
नाशिक,दि. १५ नोव्हेंबर २०२३ – ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून येत्या २० नोव्हेंबर पासून कलावंताचा “नाट्यसंग्राम” रंगणार आहे.नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात या स्पर्धेला सोमवार दि.२० नोहेंबर पासून दररोज ७ वाजता सुरुवात होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी नमूद केले आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक श्री. चवरे यांनी केले आहे
नाशिक विभागात होणाऱ्या स्पर्धेचे वेळापत्रक