लेखक -अमेय दक्षिणदासदिग्दर्शक – विनय कटारे
श्री पद्मतारा सामाजिक बहुुद्देशिय संस्था नाशिक यांनी ‘द कॉन्शन्स’ या नाटकाचा प्रयोग स्पर्धेत सादर केला. लेखक अमेय दक्षिणदास यांचा नाटकाचा विषय नाटक बघताना प्रेक्षकांना फार गुंतागुंतीचा वाटतो पण दृश्य बघताना त्यातील कलावंतांचे काम बघताना नाटक फार इंट्रेस्ट निर्माण करत होत.
यातील नवरा बायको म्हणजे त्रास देणारा नवरा सहन करणारी बायको त्या दोघांच्या जगण्यातील आणी नात्यातील संवादात छोट्या छोट्या गोष्टीचा अति विचार करून त्याचा किस काढणे त्यातून आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करणे आणि समोरचा निरुत्तर झाल्याचे पाहून स्वताहाच समाधान घेणे असा या नाटकातील नवरा.पण ( subconscious mind)मध्ये समांतर पातळीवर आपल्याला हि माहीत असते की आपण पटवून दिलेली बाजू मुळात चुकीची आहे.
पण समोर असलेली त्याची बायको त्या वेळी (confuse) गोंधळून जाते.सातत्याने असेच घडणे हे मानसिक खच्चीकरण त्या बायकोचे हे आपल्या जागरूक मनोवस्थेला पूर्ण कल्पना असते.आणि नाटकाच्या शेवटी तो तिला एक फाईल देतो आणि म्हणतो ती फाईल वाच त्यात तु केलेल्या चुका आहेत त्या पैकी २५ चुकांचे उत्तर मला तु लिहून दे त्या साठी तुला सात दिवसांची मुद्दत देतो (हे त्या पात्राच मनोविश्व) आणी नाटकाच्या शेवटी ती नवऱ्याला निरुत्तर करते नवरा हादरतो. आणि सांगते की आपला नवरा खूप बुद्धिवान असावा ही माझी इच्छा होती आणि मी तुझ्या प्रेमात पडले,लग्न केले खूप मनापासुन आपल्या नात्याला जपलं साथ दिली तु मला विचारलेल्या कुठल्याच प्रश्नात मी तुला प्रतिप्रश्न केले नाही तु हरावं निरुत्तर व्हाव अस कधीच वाटलं नाही केलही नाही कारण तु बुद्धिमान आहेस,हुशार आहे,वेगळा आहे म्हणून नाही तर मी तुज्यावर खरंच असलेल्या प्रेमामुळे. तुझ्या सर्वच प्रश्नांची उत्तर कायम माझ्याकडे होती.
मला त्रास होऊ लागला तुझ्या या वागण्याचा हा त्रास होतोय याची तुलाही जाणीव आहे आणी तु त्रास देतोय हे तुझ्या (subconscious mind) मधे आहे, पण यात माझी घुसमट होतीय, मरण होतंय,अपराआधी वाटतंय माझ्या ह्या अवस्थेचा तुझ्या कडे कुठला विचार आहे ? जाणीव आहे ? भान आहे? (बायको विषयी हे विचार हि पण मुख्य पात्राची कल्पना जी स्टेजवर घडते)
तर नाटकात हे सर्व मानसिक पातळीवर चाललंय,मुख्य पात्र त्याच वागणं विचार बायको तिच वागण विचार त्याचे परिणाम हे मानसिक पातळीवर सुरु आहे नाटकात पुढे तिसरे एक पात्र जे मंचावर येते मुख्य पात्रा बरोबर संवाद साधते त्याच्या घरात असलेल्या एका पोर्ट्रेट चित्र त्याची नकारात्मक गोष्ट हे मनातीलंच एका कोपऱ्याचा भाग जो दृश्य स्वरूपात मंचावर दिसतो.
कलाकृतीतील कुठलीही रचना ही जशी पूर्णपणे सत्य घटना असू शकत नाही तशीच ती कल्पना विलासही असू शकत नाही. नाटक सद्सदविवेकबुद्धी म्हणजेचा कॉन्शेन्सचे तर्क,नियम,निर्णय,हे स्वयसिध्द असतात त्यांना आव्हान देता येत नाही. लेखक त्याची गोष्ट नवरा बायको,यांच्या माध्यमातूम लेखक अमेय दक्षिणदास हे “द कॉन्शंन्स”या नाटकातून सांगतात
दिग्दर्शक विनय कटारे यांनी विषयानुरूप पात्र उभी करण्याचा उत्तम प्रयत्न केलाय , ऍक्टिंग एरियाचा जे कलाकार वापरताय त्याचा विचार गरजेचा वाटतो नाटकाची गोष्ट प्रेक्षकांना दिग्दर्शक प्रभावी,सोपी करून सांगतो हे उत्तम.
नेपथ्य दीपक चव्हाण यांनी अप्रतिम केलंय पांढऱ्या कापडाच्या फ्रेम त्यांच्या जागा पोर्ट्रेट साठी वापरलेली सेंटरची जागा आणि मोजके घरातील सामान नाटकाच्या गोष्टीला साजेसे,प्रभावी होते.
प्रकाश योजना विनोद राठोड यांनी केली.
संगीत संयोजन प्राणिल तिवडे यांनी केले.
वेशभूषा – भावना कुलकर्णी यांनी केली विषयाला साजेशी होती.
रंगभूषा माणिक कानडे यांची होती.
शाम हे नाटकातील मुख्य भूमिका सचिन राहाणे यांनी केली सराईत अभिनेता प्रभावी अभिनय ,स्टेजवरचा त्यांचा वावर,बॉडील्यँग्वेज,यांनी नाटकाच्या विषयाला,आशयाला प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यत नाटक पोहोचविले अप्रतिम.
मिरा यांची भूमिला भावना कुलकर्णी यांनी केलीय शांतपणे आणि संयमी त्याची कृती मंचावरचा त्यांचा वावर अप्रतिम होता आशयानुरूप त्यांनी मिरा पात्र उभे केले.
मनस्वी ही भूमिका विनय कटारे यांनी केली अप्रतिम काम आणी स्टेजवरच त्यांच असणं,दिसणं,नाटकाच्या सादरीकरणात प्रभावशाली होत.
हे तीनही कलाकार विदाऊट नेपथ्य,संगीत,लाईट शिवाय जरी यांनी सादरीकरण केले तरी ते एव्हढ्याच प्रभावी पणे सादर करू शकता अशा तयारीचे हे तिन्हीही कलाकार होते ही सादरीकरणातील जमेची बाजू…
कलाकार
सचिन राहाणे ,भावना कुलकर्णी,विनय कटारे
लेखक –अमेय दक्षिणदास
दिग्दर्शक – विनय कटारे
नेपथ्य – दीपक चव्हाण
प्रकाश – विनोद राठोड
संगीत संयोजन – प्रणील तिवडे
प्रवीण यशवंत
मोबाईल – ७७६७८९४४३५
