६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत २० डिसेंबर रोजी अश्वमेध थिएटर्स संघातर्फे पगला घोडा हे नाटक सादर करण्यात आले. हे नाटक घडते एका स्मशानात. जवळचं असं कोणीच नसलेल्या एका तरुणीच निधन झाल्यानंतर तिच्या मयताला आलेले चौघेजण तिचं शेवट जळून राख होण्याची वाट बघताना दारू पितात, पत्ते खेळतात, टवाळक्या करतात, गप्पा करतात ही या नाटकाची कथा आहे. त्या चौघांच्या अवतीभवती वावरणारी तरुणी म्हणजे पलीकडे थोड्याच अंतरावर जळणारी मृत व्यक्ती तर आहेच.
पण त्या चौघांच्या आयुष्यात येऊन गेलेल्या निरनिराळ्या स्रीयांचे प्रतीक सुद्धा आहे. शिवाय पुरुषांकडून अपमानित होणाऱ्या, धिक्कारल्या जाणाऱ्या स्त्री रूपाचं दर्शन हे आपल्याला तिच्यातून होते. वास्तवातल्या चार पुरुषांच्या बरोबरीने या अतिवास्तव तरुणीच अस्तित्व आपल्याला सहजगत्या मान्य होत ही ताकद या नाटकाची आहे.
नाटकाचे लेखन अमोल पालेकर तर दिग्दर्शन स्वप्निल गायकवाड यांचे होते. संगीत ओम देशमुख तर नेपथ्य काजल खैरनार यांचे होते. प्रकाशयोजना प्रफुल्ल दिक्षित, वेशभूषा वर्षा शेळगावकर तर रंगभूषा भाग्यश्री महाजन यांचे होते. नाटकामध्ये हेमंत – सर्वज्ञ मते, कार्तिक – प्रथमेश पाटील, लालू शेठ – आर्यन जाधव, शशी – स्वप्निल गायकवाड, मुलगी – साक्षी बनकर यांनी भूमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक – सेलिब्रेटी,
लेखक-निरंजन मार्कंडेयवार
दिग्दर्शक -विद्या करंजीकर
संस्था – अर्थनीती फाउंडेशन ,नाशिक