६३ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ३० नोव्हेंबर २०२४ रोजी नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्था, नाशिक संघाकडून पिंडकौल हे नाटक सादर करण्यात आले. हाती भागवत पताका आणि मुखी विठ्ठलाचे नाम घेऊन देवाच्या दारी क्षणभर उभे राहून आत्मज्ञानाचा सहज सोपा मार्ग दाखवणारा वारकरी संप्रदाय. या संप्रदायाने जगाला पर्मार्थाचा अमृतानुभव दिला. शेकडो वर्षांपासून वारकरी संप्रदायाने ही परंपरा जोपासली. पण पर्मार्थाच्या मार्गात प्रसिद्धी आणि लालसेला भुलून अनेक संधीसाधू माणसांचा शिरकाव आज आपल्याला येथे पाहायला दिसतो.
पिंडकौल या नाटकातील प्रसंगात मठाधीश ह. भ. प. परशुराम महाराज यांच्या निवृत्तीनंतर पुढील मठाधीश कोण होणार. यावर त्यांच्या शिष्यांमध्ये स्पर्धा चालू आहे आणि ही स्पर्धा कुठल्या विद्रुप थरापर्यंत जाऊ शकते याचा वेध घेणारे पिंडकौल हे नाटक आहे.
पिंडकौल हे नाटकाचे लेखन रत्नदीप उतेकर यांचे होते. योगेश्वर थोरात यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून नेपथ्य प्रकाश पुरोहित यांचे होते. प्रकाश योजना विनोद राठोड यांनी केली असून रंगभूषा माणिक नाना कानडे यांची होती. या नाटकामध्ये योगेश्वर थोरात, संदीप आजगे, संदीप पवार, निलेश आहेरराव, निलेश चव्हाण, कविता होले, मयूर बोराडे, श्लोक अल्हाट, ईशा साळवे, कीर्ती नागरे, हिमांशू बोराडे, रेखा देशपांडे, सुनीता शर्मा, निल वाणी, सुचिता काळे, उल्हास वानखेडे, पुनम वानखेडे, जॅकी ठाकरे, जयप्रकाश पुरोहित यांनी नाटकात भूमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक
चेहरा मोहरा…
संस्था – नम्रता कलाविष्कार, नाशिक,
लेखक – दिलीप जगताप,
दिग्दर्शक – राजेश टाकेकर