लेखक-दिग्दर्शक -संकेत सिमा विश्वास
एका मुलीवर होणारा बलात्कार आणि एक प्रियकर आपल्या प्रेयसीवरच बलात्कार करतो या गोष्टीवर नाटक बोलत.इथं लेखकाचा गोंधळ आहेबलात्कारीत स्त्री आणि प्रियकरानीं केलेला बलात्कार या दोनही घटना समाजात जे इशू क्रियेट करता त्यातला फरक लक्षात घेणे त्यातून निर्माण होणाऱ्या घटना,प्रसंग,त्याचे सामाजीक दृष्ट्या सर्वांगीण परिणाम,त्याकडे बघण्याची आपली दृष्टी आपली भूमिका तयार करित असते इथ लेखकाचा गोंधळ दिसतो.आणि लेखकावर चित्रपटाचा प्रभाव ही दिसतो.आणि नाटकाची दिशा भरकटते.
बलात्कार हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने नाटकात येणारे दृश्य फार प्रभावी पणे सादर केले गेले , प्रेक्षकही प्रभावीत झाले,प्रेक्षक विचार प्रवृत्त होणे गरजेचे होते ते साधलं गेल नाही. लेखकाने हा विचार केला पाहिजे.
तर प्रियकराने प्रेयसीवर केलेला बलात्कार त्या मुलीच्या कुटुंबाची भूमिका, मुलाचे हतबल आई वडील घाबरलेले, पुढे या बलात्कारचा कोर्टात खटला वा शेवटी न्यायाधिशांच जजमेंट अस की केंद्र सरकार,राज्य सरकार अनुषंगाने येणार्या सर्व संस्था यांनी सेक्स एज्युकेशन, काौन्सलींग याची आंबलबजावणी करणे,प्रियकरला १० वर्षाची सक्तकारावास इथं नाटक संपत पण ब्लॅक आऊट नंतर परत दृश्य सुरु होते त्या दुष्यात बलात्कारीत मुलीचे वडील त्या मुलाचा खून घडवून आणता इथंही नाटक संपत नाही परत ब्लॅक आउट व परत पुढचे दृश्य वेश्या वस्तीचे, मूळ आशयाला मारक होते,छोट्या लिहिलेल्या कवितेतील केवढं विश्व् त्यातील दृश्य डोळ्यासमोर उभी राहते. लेखकाचा आशय काय ? नेमकं सांगायचं काय ? हा विचार झाला पाहिजे.म्हणजे अनावश्यक दृष्य वगळली जातील.
ही वरील नाटकाची गोष्ट आहे.हे नाटक बघताना ‘oh my god ‘ 2 या अक्षय कुमारच्या हिंदी ८०% सिनेमाची आठवण होते -संकेत विश्वास यांनी दिग्दर्शन केलंय नाटकाला साजेस बलात्काराच दृश्य स्टेजच्या मधोमध आठ बाय सहा किंवा सा सहा आठच्या उंचीवर असलेल्या लेव्हलवर घडते इतकी बघण्याची कन्फर्बलेटी दिग्दर्शक घेतो आणि बघणाऱ्याला ही देतो जणू तो बलात्कार माझ्या समोर तो करतो आहे मी अनेक लोक ते समोर खुर्च्या टाकून आम्ही बघतोय, दिग्दर्शक असच बघतोय दुष्य ? यातून कुठला परिणाम साधने अपेक्षित आहे.नाटकातील सीन, दृश्य,त्या तील दिग्दर्शकीय विचार इथं महत्व्वाचा वाटतो दिग्दर्शकाच सर्व नाटक तांत्रिक दृष्ट्या अतिशय स्वच्छ होत!दिग्दर्शकाने अतिशय सफाईदार नाटक करण्याचा प्रयत्न उत्तम होता.
प्रकाश योजना – समीर तभाने यांनी प्रकाश योजना केली त्यानी केलेलं एरिया लाईटिंग उत्तम होत बाकी प्रकाश योजनेला फारसा वाव नव्हता संगीत संयोजन – संगीत संयोजन तेजस बिल्डीकर यांनी केले जे नाटकाला अनुरूप होते. नेपथ्य – मुक्ता यांनी नेपथ्य केले अप्रतिम नेपथ्य फक्त आणी फक्त लेव्हल चा वापर सजेस्टिव जे नाटकात घडणाऱ्या दृश्यांना जिवंत पणा देत होत्या काही अपवाद वगळता. वेशभूषा – वैभवी चव्हाण यांनी केली ती कथानकाला साजेसी होती.
कलावंत – प्रतिक ची भूमिका करणार मुलगा याचा खूप संयमी असा अभिनय होता अप्रतिम काम केलंय या कलाकाराने सुंदर.
शिल्पा ची भूमिका ज्या मुलीवर बलात्कार होतो ते पात्र उत्तम काम केलंय बलात्कारच त्यांनी साकारलेलं दृश्य त्यांची maychurity अभिनय अप्रतिम होत कोर्टातलं त्यांच वागण, बोलणं परिणाम कारक होत नाटकाच्या अर्थाने जमेची बाजू.
दुसाणे वकिलाची भूमिका करणारी मुलगी वकील आणि एक स्त्री म्हणून कोर्टातीन तिचा अप्रोच,डिबेट,उत्तम होता. रिकामे या वकिलाची भूमिका करणारे चेतन सुशीर यांनी अप्रतिम काम केलंय विषयाची त्यांना उत्तम भाण होत उत्तम वकील त्यांनी उभा केला.
विशेष सहकार्य – नाशिक वर्क्स युनियन (सिटू भवन)डॉ डी एल कराड सिटू अधिकारी नाशिक अपूर्व इंगळे,प्रियंपालं दुशांती,तुशार कुलकर्णी,डॉ विजय शर्मा. प्रवीण यशवंत मोबाईल – ७७६७८९४४३५
आजचे नाटक दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ७ वाजता ‘उम्मीद ‘ लोकहितवादी मंडळ नाशिक स्थळ-प सा नाट्यमंदिर नाशिक