स्त्री,पुरुष पूर्णत्वाचा शोध ? “ही कशाने धुंदी आली”

६२ हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नाशिक - प्रवीण यशवंत 

0

विंध्यावासिनी विद्या विकास शिक्षण नाशिक या संस्थेने “ही कशाने धुंदी आली” हे नाटक स्पर्धेत सादर केले.दोन मित्रांच्या गोष्टीतून नाटक उलगडते या दोघांच्या जगण्याचा धुंदीत अधिराज तृतीयपंथी स्त्रीपुरुषाला तो तुच्छ म्हणून चेष्टा करतो, त्यांच्या समूहातील प्रमुख तृतीय पंथी त्याला शाप देतो  मिळालेला शाप म्हणजे तुझ्या मुलाचा बाप तुजा मित्र असेल या वाक्याला मस्तवाल पणे घेणारा अधिराज वा विराज कथेच्या या अनुषगाने आपला मस्तवाल व धुंदीत असणारे दोघे पुढे नाटकाच्या  माध्यमातून घटना प्रसंग विशिष्ट क्रमाने  लेखक आपल्याला सांगतो.व दिग्दर्शक प्रभावी पणे सादर करतो.

निसर्गाने स्त्री,पुरुष निर्माण केले त्यांना अपापल्या भावना,जाणीवा आहे माणवी जगण्यातून ती आपण समजूनही घेतो त्यात अनेक नाती असता,संवेदना जाणीवा असता त्यात धुंदी आली तर क्रौर्य,हिंसा निर्माण होते ती नाटकाच्या घटना प्रसंगातूनही दिसते. ते पुढील कारणाने,अधिराजचा विराजवर असलेला संशय की आपल्या बायकोचे व याचे असलेले संबध. या संशयाने हादरलेला, चिडलेला विराज. नगर सोडून जाणे तिथे विराजच्या संपर्कात येणारी स्त्री, त्याच भावनिक दृष्ट्या तिच्यात अडकणे, तिच्या म्हणण्या प्रमाणे अधिराजची बाजू समजून घेण्यासाठी परत नगरात येणे, दोघेही स्त्री पूर्णत्वाचा शोध घेणे, आपल्या सर्वांमध्ये काही प्रमाणात स्त्रीचे गुण आहे असे त्या दोघांना वाटणे. विराज,अधिराज च्या म्हणण्या  प्रमाणे आपल्यात जर स्त्री चे गुण आहेत तर आपल्याला काय व्हायला आवडेल तर अधिराज म्हणतो स्त्री व्हायला आवडेल मला, कारण स्त्रीत्वाला तीच  मातृत्व पूर्णत्व देते असे लेखक म्हणतो. नाटक पुढे स्त्री पुरुष पूर्णत्वाचा शोध घेत जाते.? आणि पडदा.

Maharashtra State Drama Competition / Searching for male and female perfection? "Hee Kashane Dhundi Aali "

लेखकाला सांगायचं काय ? 
नाटक फार कन्फ्युज  वाटते. दिग्दर्शन  भरत कुलकर्णी यांनी केले आहे. पहिला अंक सुरुवातीचे वीस मिनिटे दृशांचे अतिशय प्रभावी ओपनिंग केले नंतर नाटकात सादर होणाऱ्या दृष्यामुळे नाटक भरकटले की काय की काय असे वाटते. दिग्दर्शकाला इंटीमेट दृश्य सजेस्टिव व प्रभावी सादर करता आले असते. स्त्री,पुरुषाच्या लैंगिक भावनाचे दृश्य दिग्दर्शकाने वीस मिनिटे स्टेज वर, दृश्य स्वरूपात सादर केले, यातून दिग्दर्शकाने काय साधले ? ही श्रुंगारीक दृश्य अतिशय बिभत्स पद्धतीत सादर झाली आपली रंगीत तालीम आपल्या नाटकाच काय होतय काय पाहिजे किती पाहिजे दिग्दर्शकाला अपेक्षित परिणाम साधाला जातोय का ? त्या अनुषंगाने काही बदल आहे का ?

हेच सगळं आपण रंगीत तालमीत बघतो.नाटक आपल्यासाठी जेवढे आहे तेव्हढेच ते प्रेक्षकांचे आहे अडीच तीन तास काढून ते तुमच नाटक बघायला आले असता.आपण त्यांना काय आणि  कस दोखवतोय हे दिग्दर्शकाने समजून घेतलं पाहिजे.त्याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे.

प्रकाश योजना रवी राहाणे यांनी केली नाटकाला अनुरूप अशी होती. रंगीत,संगीत नाटक असताही प्रकाश योजनाकारणाने नाटकाचा विषय सोडला नाही, कुठेही बटबटीत कलर वाटले नाही.
नेपथ्य सागर धोंडगे,प्रशांत पाटील  यांनी केल जे नाटकाला साजेसे होते काही दृष्यात परिणाम कारक नेपथ्याचा वापर होता.

संगीत साज तरंग यांनी केले जे प्रभावशाली होते डफ चा केलेला वापर उत्तम परिणाम होता.ही नाटकाची जमेची बाजू होती.गायिका – अनुजा देवरे. वेशभूषा ,रंगभूषा माणिक कानडे यांनी केली वेशभूषा विषयानुरूप होती.

अधिराज ही भूमिका भरत कुलकर्णी यांनी अतिशय प्रभावशाली साकारलीये खणखणीत आवाज श्रुंगार दृश्यातील एक स्त्री म्हणून साकारलेले प्रणय दृश्य हे उत्तम साकारलंय पण प्रेक्षकांना ते बिभत्स दिसत होते.अतिशय सुंदर स्त्री पात्र भरत कुलकर्णी यांनी साकारलंय त्यांनी केलेलं काम सोप नाही अप्रतिम स्त्री भूमिका त्यांनी पूर्णत्वास नेली दुसऱ्या पूर्ण अंकात पुरुषाने केलेल्या स्त्री पात्राचा मोठा प्रभाव होता आशय दृष्ट्या महत्वाचा होता.

Maharashtra State Drama Competition / Searching for male and female perfection? "Hee Kashane Dhundi Aali "

विराज ची भूमिका रोहित पगारे यांनी खणखणीत केली ते स्वता नाटकाचे लेखक असल्याने काय व कसे करायचे याचे त्यांना उत्तम भान होते प्रणय दृश्य त्यांनी फार तन्मयतेने साकारले पण त्याच स्थळ रंगमंच असल्याने प्रेक्षकांना ते आवडले नाही  ते दृश्य गरजेचे नसताही आले आणि  बिभत्स पणे आले व नाकारले गेले.एकंदरीत पूर्ण नाटक बघता रोहित पगारे यांचा अभिनय वाचिक,कायिक,परिणाम कारक होता स्टेजवर त्यांचा वावर आत्मविश्वास पूर्ण होता सहज होता नाटकासाठी ही जमेची होती.

कलावंत- भरत कुलकर्णी,रोहित पगारे,पूजा घोडके,हमजा शेख,चैतन्य त्रांबके,अवतार कावळे, सागर धोंडगे,प्रशांत पाटील,निकिता भोर,प्रियंका सिंह, राहुल बर्वे,महादेव गवई.या सर्व कलावंतानी उत्तम अभिनय केला.
प्रवीण यशवंत 
मोबाईल – 7767894435

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.