दोन परस्पर विरोधी शक्तींमधील संघर्ष दाखवणारे नाटक “सशक्त”

६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र

0

६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत १५ डिसेंबर रोजी जी. एम. फाउंडेशन संघातर्फे “सशक्त” हे नाटक सादरीकरण करण्यात आले. सत आणि असत , दुष्ट आणि सृष्ट, देव आणि दानव ह्या दोन परस्पर विरोधी शक्तींमधील संघर्ष हा सार्वकालिक. हाच संघर्ष अतिशय प्रभावीपणे मांडणारे प्रा.दिलीप जगताप यांचे ‘सशक्त’ हे नाटक जी. एम,फाउंडेशन नाशिक पुरस्कृत आणि स्वामिनी थिएटरर्स, नाशिक ह्या संस्थेतर्फे रविवारी, दिनांक १५ डिसेंबर रोजी, सांस्कृतिक कार्य संचलनालया तर्फे आयोजित ६३ व्या राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर करण्यात आले.

अंधश्रद्धा आणि चेटूक, भुताटकी इत्यादी बुरसटलेल्या विचारांचा पगडा असलेया जमातींचे एक गाव आणि  त्या गावात येऊन आधुनिक पद्धतीने शेती आणि फलोत्पादन करण्यासाठी आपली प्रयोगशाळा सुरु करणारा इमान यांच्यातील संघर्ष नाटकात मांडलेला आहे. समाजातील अंधश्रद्धा आणि वाईट परंपरा यांना छेद देऊन जातीजमातीमधील पूर्वापार चालत आलेला शत्रुभाव, त्यातून उद्भवणाऱ्या दंगली, पिढीजात लढा, परस्पर सामजस्य आणि सर्वधर्म समभाव स्विकारून मिटवण्याचा इमानचा प्रयत्न आणि या प्रयत्नात त्याला मनोभावे साथ देणारी त्याच गावातील नायकाची मुलगी यांचा लढा नाटकातून दाखवण्यात आला.

नाटकाचे दिग्दर्शन आणि इमानाची मुख्य भूमिका दिलीप काळे यांनी अतिशय दमदारपणे साकारली. त्यांना अनन्या शिंदे, समाधान मुर्तडक,भूषण गायकवाड, भैरवी कमांनकर, गजानन चोपडे, सुनील गांगुर्डे, ओम पऱ्हे, विकी ताठे, अश्वजीत गायकवाड, गौरव तेजाळे या कलाकारांची सक्षम साथ लाभली. नाटकाची निर्मिती भूषण गायकवाड यांची आणि नेपथ्य समाधान मुर्तडक, प्रकाशयोजना विनोड राठोड, संगीत तेजस बिल्दीकर, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा अनन्या आणि भैरवी यांची होती.

दिगंबर काकड    
मो-९५९५९९६०३३ 

आजचे नाटक – स्पायडरमॅन
संस्था –  दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग, नाशिक
लेखक – विद्यासागर अध्यापक
दिग्दर्शक :- अमित मुळे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.