तुकारामाची विरक्ती,आसक्ती आणि कुटुंबं कथा.”आपुलाची वाद आपणासी”

६२ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नाशिक-प्रवीण यशवंत

0

मायको एम्प्लॉईज फोरम नाशिक या संस्थेने स्पर्धेत “आपुलाच वाद आपल्याशी” हे नाटक सादर केले. लेखक डॉ. समीर मोने यांनी लिहिलेल्या  “आपुलाची वाद आपल्याशी” या नाटकात संत तुकाराम यांच्या कुटुंबाची गोष्ट नाटकातून समोर येते.आणि कान्होबा भोवती फिरते.

तुकारामाच्या परिवारातील सावजी मोरे,तुकाराम मोरे,कान्होबा मोरे त्यांचे आई,वडील त्यांच्या बायका यांच जगन,आयुष्य भावनिक आंदोलन निर्माण करतात सावजीची विरक्ती,तुकारामावर आलेली जबाबदारी त्यांचे वैकुठाला जाणे,शेवटी कान्होबाचे गाव सोडणे तुकारामाच्या मुलाला नारायनला बरोबर घेणे पण नारायन शेवटी आपले वडील संत तुकाराम याची टाळ हातात घेतो नारायन बुवा हे विठ्ठलाच्या भक्ती मार्गात तल्लीन…इथे नाटके संपते तुकारामाच्या परिवाराची गोष्ट वरील क्रमाने रंगमंचावर सादर होते.

दिग्दर्शक सचिन राहाणे  यांनी केलय नाटक विषयानुरूप मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो नाटकाची प्रत्येक फ्रेम सुंदर दिसावी हा प्रयत्नही त्यांचा जानवतो पण नाटककाराचा विषय,आशय प्रेक्षकांपर्यंत भावनिक दृष्ट्या पोहोचत नाही,नाटककाराने लिहिलेला  बेसच मुळात तुकारामाच्या परिवारातील सावजी मोरे,तुकाराम मोरे,कान्होबा मोरे त्यांचे आई,वडील त्यांच्या बायका यांच जगन,आयुष्य भावनिक आंदोलन निर्माण करतात सावजीची विरक्ती,तुकारामावर आलेली जबाबदारी त्यांचे वैकुठाला जाणे,शेवटी कान्होबाचे गाव सोडणे तुकारामाच्या मुलाला नारायनला बरोबर घेणे पण नारायन शेवटी आपले वडील संत तुकाराम याची टाळ हातात घेतो नारायन बुवा हे विठ्ठलाच्या भक्ती मार्गात तल्लीन…

ही भावनिक दृश्य ज्या संवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे होते,इथं दिग्दर्शक कमी पडतो.नाटक सुरु होते पडदा उघडतो स्टेजवर नेपथ्य झगझगीत लाईट्स स्टेजवर एक पात्र ते नाटकाच्या सुरुवातीचे डायलॉग ज्या पद्धतीत बोलते आवाजाच्या ज्या उंचीच्या स्तरात बोलते त्याचा परिणाम नाटकाचा tempo ठरवितो या ओपनिंग सिनकडे दिग्दर्शकाचे लक्षच नव्हते लाईट्स,नेपथ्य प्रेक्षागृहात इतके अंगावर येत होते की स्टेज वरचा कान्होबा तंत्राने झाकला गेला.

Maharashtra State Drama Competition /Tukaram's Aversion, Attachment and Family Story.Apuluchi Vaad Aapnasi

तेच इंद्रायणीत तरंगणारी गाथेचा प्रसंग दिग्दर्शक परिणाम कारक करू शकले नाही ती त्या प्रसंगाची गरजही होती नाटकाच्या टेम्पो  साठी.तंत्राचा अति वापरात व प्रसंगाचा वेग याने पहिला अंक सर्व तांत्रिक साधन असूनही परिणाम साधू शकले नाही. पहिला अंक लेंदी वाटतो.त्या विरुद्ध दुसऱ्या अंकाने अपेक्षित परिणाम साधाला.

नेपथ्य दीपक चव्हाण,विनय कटारे यांनी केलय नाटकाच्या गोष्टीला साजेशी वातावरण निर्मिती नेपथ्याने केली,कान्होबा,तुकारामाचे घर झाडाचा पार हे विषयानुरूप परिणाम साधत होते, मधोमध विठ्ठल,रुख्माईची मूर्तीची खटकत होती सावजी,तुकाराम हे दोन विठ्ठल आहेच की नाटकात हे प्रेक्षकांना कळतच…

प्रकाश योजना विनोद राठोड यांनी केली विषयानुरूप प्रकाश योजना करण्याचा प्रयत्न केला.तुकारामाचा वैकुंठाचा प्रसंग परिणाम कारक अप्रतिम असा साकारलाय,पण नाटकाची गोष्ट तंत्रात हरवून जाता कामा नये हे भान असणं महत्वाचे आहे आपण जसे लाईट करत असतो तसे किती तरी लोक टीम मध्ये काम करत असतात सर्वांचेच कष्ट असतात त्यावर परिणाम नको व्हायला,प्रकाश योजना लावूड असल्यामुळे समोर मंचावर  घडणारे प्रसंगात अडथळा येत होता मागे साईकभर पडद्यावरचा अंबर, ब्लू ऍव्हरेजली चालू असलेला लाईट,विंगेतील लाईट,समोरून येणारे लाईट,मध्ये असणारे लाईट, अप्रतिम होते.पण रंगमंचावर सुरु असलेलं दृश्य प्रेक्षकांना ते नीट बघूच देत नव्हते. दृश्याला मारक वाटले लाईट. असे बरेच दुर्ष्यांबाबतीत घडले.शेवटी नाटकासाठी प्रकाश योजना आहे की लाईट साठी नाटक. ? काही प्रसंग अप्रतिम साकारलये प्रकाशांनी बाकी प्रसंगाचा समतोल महत्वाचा वाटतो,तो झाल्यास नाटक सकारात्मक अपेक्षित परिणाम साधू शकेल.

संगीत संयोजन सचिन राहाणे  यांनी केल नाटकांच्या काही प्रसंगात वाजलेली विठ्ठलाची गाणी त्याची निवड नाटकाच्या विषयानुरूप होती व काही ठिकाणी संगीत. खूपच लावूड वाजल
वेशभूषा मोहिनी सरोदे,भावना कुलकर्णी केली विषयाला साजेसी वेशभूषा होती. रंगभुषा ललित कुलकर्णी यांनी उत्तम केलीय.

कान्होबाचा रोल करणारे प्रणील तिवडे याने विषयानुरूप भूमिका साकारण्याचा उत्तम प्रयत्न केलाय,आपण मंचावर बोलत असलेलं वाक्य  कस प्रेक्षकांना कस ऐकू येईल याचा विचार व  प्रयोगा अगोदर शक्य असल्यास रिकाम्या थियेटर मध्ये आवाज चेक करणे,डॉयलॉग बोलून बघणे प्रणिल तिरडे चा आपली भूमिका उत्तम साकारण्याचा प्रयत्न जाणवत होता.
तुकाराम ही भूमिका जय शुक्ल यांनी केली जय शुक्ल यांनी अप्रतिम आपल्या भावनांचे प्रदर्शन केले पात्रानुरूप उत्तम अभिनय केला. तुकारामाचे वडील ही भूमिका सम्राट सौदाणकर यांनी विषयानुरूप केली.

कलावंत प्राणिल तिवडे,सोनली  उमा सुरेश,जय शुक्ल,केतकी कुलकर्णी,सावजी विजय घुमरे,श्रुतिका घुले गाडे,सम्राट सौदाणकर,शब्दाजा वेल्दोडे देशपांडे,स्वरूप बागुल, निलेश सोनार,स्वप्नील वानखेडे,सानी धात्रक,दिनेश वाघ सुरज बोरसे,राधा चव्हाण या सर्व कलावंतानी उत्तम अशा आपल्या भूमिका साकरल्या.

लेखक – संजय मोने
दिग्दर्शक – सचिन राहाणे 
नेपथ्य – दीपक चव्हाण, विनय कटारे
प्रकाश योजना – विनोद राठोड
संगीत संयोजन -समीर राहाणे.

प्रवीण यशवंत
मोबाईल -7767894435

प्रवीण यशवंत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.